शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

BSNL ची आपल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठी भेट; कंपनीने सुरू केली HD कॉलिंग सेवा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 15:39 IST

BSNL 5G नेटवर्कची चाचणी सुरू असून, लवकरच देशभरात ही सेवा सुरू केली जाईल.

BSNL आपल्या ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी सातत्याने आपल्या नेटवर्कचा विस्तार करत आहे. कंपनीने आतापर्यंत देशभरात 50 हजारांहून अधिक नवीन 4G मोबाइल टॉवर्स बसवले असून, त्यापैकी 41 हजारांहून अधिक मोबाइल टॉवर सुरू झाले आहेत. हे 4G टॉवर्स बसवल्यामुळे कनेक्टिव्हिटी पूर्वीपेक्षा अधिक चांगली झाली आहे. दरम्यान, आता, कंपनीने आपल्या 9 कोटींहून अधिक ग्राहकांसाठी HD कॉलिंग सेवाही सुरू केली आहे. युजर आता BSNL च्या नेटवर्कवर HD (हाय डेफिनेशन) कॉल करता येईल. BSNL 4G युजर्स त्यांच्या नंबरवर ही VoLTE सेवा अॅक्टिव्ह करू शकतील. 

बीएसएनएल नंबरवर एचडी कॉलिंग सुरू करण्यासाठी ग्राहकांना त्यांचे सिम अपडेट करावे लागेल. म्हणजे, त्यांचे सिम हे 4G/5G असायला हवे, तर त्यावर एचडी कॉलिंग करता येईल. BSNL च्या 2G/3G सिमकार्डवर एचडी कॉलिंग करता येणार नाही. ज्यांच्याकडे 2G/3G कार्ड्स आहेत, त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. कंपनी ग्राहकांना मोफत 4G सिम कार्ड देत आहे. यासाठी ग्राहकाला त्यांच्या जवळच्या टेलिफोन एक्सचेंज किंवा कस्टमर केअर सेंटरला भेट द्यावी लागेल. आवश्यक कागदपत्रे पडताळणीनंतर ग्राहकाला नवीन 4G/5G सिम कार्ड मोफत मिळेल.

HD कॉलिंग कशी सुरू करायची?तुम्हाला तुमच्या BSNl नंबरवर VoLTE/HD कॉलिंग सुरू करण्यासाठी फोनच्या मेसेज अॅपमध्ये ACTVOLTE टाईप करुन 53733 वर मेसेज पाठवावा लागेल. संदेश पाठवल्यानंतर काही मिनिटांत तुमच्या नंबरवर VoLTE सेवा सुरू केली जाईल. सेवा सुरू झाल्यानंतर तुम्ही कुठल्याही नंबरवर एचडी कॉलिंग करू शकता. एचडी कॉलिंगसाठी अट एकच आहे, ती म्हणजे तुम्ही 4G नेटवर्क असलेल्या भागात असायला हवेत. 

लवकरच 5G सुरू होणारBSNL पुढील वर्षी जूनपर्यंत देशभरात 4G सेवा सुरू करणार आहे. याशिवाय कंपनी 5G चीही चाचणी करत आहे. अशा स्थितीत पुढील वर्षाच्या अखेरीस बीएसएनएलची 5G सेवा सुरू होऊ शकते. 

टॅग्स :BSNLबीएसएनएलAirtelएअरटेलJioजिओVodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)businessव्यवसायtechnologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोन