बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 11:28 IST2026-04-10T11:27:07+5:302026-04-10T11:28:19+5:30

BSNL vs Jio vs Airtel : nPerf अहवालानुसार BSNL ठरली देशातील सर्वोत्तम फिक्स्ड-लाइन इंटरनेट कंपनी. Jio आणि Airtel पेक्षा जास्त अपलोड स्पीड आणि उत्तम स्ट्रीमिंगमुळे BSNL ने मारली बाजी.

BSNL vs Jio vs Airtel : BSNL returns to the market...! Left behind Jio and Airtel; Becomes the number-1 company in the country | बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी

बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी

एकेकाळी 'सरकारी' म्हणून दुर्लक्षित राहिलेली भारत संचार निगम लिमिटेड आता खासगी टेलिकॉम कंपन्यांना घाम फोडताना दिसत आहे. इंटरनेट गुणवत्तेच्या बाबतीत BSNL ने रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल यांसारख्या बलाढ्य कंपन्यांना मागे टाकत २०२६ च्या आर्थिक वर्षात देशातील नंबर-१ फिक्स्ड-लाइन ऑपरेटरचा मान मिळवला आहे. फ्रान्सच्या 'nPerf' या नेटवर्क टेस्टिंग कंपनीच्या ताज्या अहवालातून ही धक्कादायक आणि कौतुकास्पद माहिती समोर आली आहे.

इंटरनेटची गुणवत्ता मोजण्यासाठी nPerf 'nPoints' नावाचा स्कोअर वापरते. यामध्ये डाऊनलोड स्पीड, अपलोड स्पीड, लेटन्सी, ब्राउझिंग आणि व्हिडिओ स्ट्रीमिंग या सर्व घटकांचा विचार केला जातो. या सर्वेक्षणात BSNL ला ८९,१७४ nPoints मिळाले आहेत, तर एअरटेलला ७४,९७५ आणि जिओला ७३,९५७ गुण मिळाले आहेत. यावरून हे स्पष्ट होते की BSNL ने केवळ वेगच नाही, तर एक संतुलित इंटरनेट अनुभव देण्यात यश मिळवले आहे.

BSNL च्या डाऊनलोड स्पीडमध्ये वर्षागणिक २१% वाढ होऊन तो ७८.५ Mbps वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, कंपनीचा अपलोड स्पीड ७५.२६ Mbps इतका आहे, जो जिओ आणि एअरटेलच्या तुलनेत कितीतरी पटीने सरस आहे. जिओचा डाऊनलोड स्पीड ७९.६ Mbps असला तरी त्यांचा अपलोड स्पीड केवळ ३३.४६ Mbps नोंदवण्यात आला आहे.

FTTH सेगमेंटमध्ये चुरस
फायबर-टू-द-होम म्हणजेच ब्रॉडबँड स्पीडच्या बाबतीत एअरटेल २४१.७२ Mbps सह अजूनही आघाडीवर आहे. त्यानंतर जिओ (२२५.१८ Mbps) आणि BSNL (१९८.५४ Mbps) यांचा क्रमांक लागतो. मात्र, एकूण फिक्स्ड-लाइन इंटरनेट गुणवत्तेत BSNL ने सर्वांना धोबीपछाड दिली आहे.

स्वस्त प्लॅन्स आणि आता सुधारलेली इंटरनेट सेवा यामुळे ग्राहकांचा कल पुन्हा एकदा सरकारी टेलिकॉम कंपनीकडे वळताना दिसत आहे.

Web Title : बीएसएनएल की शानदार वापसी: जियो, एयरटेल को पछाड़ा, बना नंबर 1!

Web Summary : बीएसएनएल इंटरनेट गुणवत्ता में जियो और एयरटेल से आगे, भारत का नंबर 1 फिक्स्ड-लाइन ऑपरेटर बना। एनपरफ के अनुसार, बीएसएनएल डाउनलोड और अपलोड स्पीड में बेहतर है। सस्ती योजनाएं ग्राहकों को आकर्षित कर रही हैं।

Web Title : BSNL Back on Top: Surpasses Jio, Airtel in Fixed-Line Internet!

Web Summary : BSNL is now India's top fixed-line operator, surpassing Jio and Airtel in internet quality. nPerf data shows BSNL leads in overall score, download, and upload speeds, offering a balanced internet experience. Improved services and affordable plans attract customers.