जिओला टक्कर देणार BSNLचा 'हा' प्लॅन; 1500 GB डेटा मिळणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 15:46 IST2020-01-11T15:40:39+5:302020-01-11T15:46:22+5:30
या नवीन प्लॅनमध्ये FUP डेटा लिमिट 1500GB म्हणजेच 1.5TB आहे. हा प्लॅन भारत फायबर पोर्टफोलिओचा भाग आहे.

जिओला टक्कर देणार BSNLचा 'हा' प्लॅन; 1500 GB डेटा मिळणार!
नवी दिल्ली : भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) भारतात एक नवीन ब्रॉडबँड प्लॅन आणला आहे. हा प्लॅन 1999 रुपयांचा आहे. बीएसएनएल आपल्या या प्लॅनने जिओफायबरच्या 2499 रुपयांच्या डायमंड प्लॅनला टक्कर देणार आहे.
सध्या भारत फायबर ब्रॉडबँड कॉम्बो प्लॅन काही सर्कलमध्ये सुरु आहे. यामध्ये 200Mbps स्पीड देण्यात येत आहे. हा प्लॅन सध्या तेलंगना आणि चेन्नई सर्कलसाठी प्रमोशनल आधारवर आणला असून यामध्ये 90 दिवसांची मर्यादा आहे. या नवीन प्लॅनमध्ये FUP डेटा लिमिट 1500GB म्हणजेच 1.5TB आहे. हा प्लॅन भारत फायबर पोर्टफोलिओचा भाग आहे. FUP लिमिट संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड 2Mbps कमी होईल.
1999 रुपयांच्या प्रमोशनल भारत फायबर प्लॅन लाँच केल्याच्या तारखेनंतर (8 जानेवारी 2020) फक्त 90 दिवसांसाठी मर्यादित आहे. बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये स्डँडर्ड डेटा बेनिफिटसोबत अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचा सुद्धा फायदा होणार आहे. या प्लॅनची मर्यादा एक महिन्यांची आहे.
तसेच, ग्राहकांना सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून एक महिन्याचे चार्ज सुद्धा द्यावे लागणार आहे. हा ब्रॉडबँड प्लॅन बीएसएनएलच्या वेबसाइटवर देण्यात आला आहे. ग्राहक 6 एप्रिल 2020 पर्यंत हा प्लॅन घेऊ शकणार आहेत. या प्लॅनचा कालावधी जास्त नसणार आहे. त्यामुळे प्रमोशनल ऑफरची डेटलाइन संपल्यानंतर ग्राहकांसाठी दुसरा ऑप्शन पाहावे लागेल.
विशेष म्हणजे, बीएसएनएल भारत फायबर प्लॅनमध्ये ऑफरनुसार 999 रुपयांचा मोफच अॅमेझॉन प्राइम सब्सक्रिप्शन देण्यात येतो. मात्र, सध्या स्पष्ट नाही की, या प्लॅनमध्ये ग्राहकांना या ऑफरचा फायदा मिळणार की नाही.