BSNLच्या ग्राहकांना मिळणार 78 रुपयांत अनलिमिटेड डेटा आणि कॉल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 14:01 IST2018-10-18T13:59:39+5:302018-10-18T14:01:42+5:30
सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी STV-78 प्रीपेड रिचार्ज प्लॅन आणला आहे.

BSNLच्या ग्राहकांना मिळणार 78 रुपयांत अनलिमिटेड डेटा आणि कॉल...
नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी STV-78 प्रीपेड रिचार्ज प्लॅन आणला आहे.
बीएसएनएलच्या या नवीन प्लॅनची किंमत 78 रुपये आहे. दुर्गा पूजा, दसरा आणि दिवाळी सणानिमित्त हा प्लॅन कंपनीने आपल्या ग्राहकांना आणला आहे. 78 रुपयांचा या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉल, डेटा आणि व्हिडीओ कॉल्स करता येणार आहे. अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग अॅक्टिव्ह करण्यासाठी ग्राहकांना STV COMBO78 असा मेसेज 123 या नंबरवर पाठवावा लागणार आहे.
याचबरोबर, यामध्ये ग्राहकांना रोज 2 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 10 दिवसांची असल्याचेही कंपनीने सांगितले आहे. म्हणजेच कंपनीकडून एकूण 20 जीबी डेटा दिला जाणार आहे. हा प्लॅन 15 ऑक्टोबरपासून लागू करण्यात आला असून देशभरातील ग्राहकांना 3 जी सुविधेअंतर्गत याचा लाभ घेता येणार आहे. विशेष म्हणजे रोमिंगमध्येही अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे.
(BSNLच्या ग्राहकांना मिळतेय मोफत अॅमेझॉन प्राईम मेंबरशिप)