८४ दिवसांची वैधता अन् अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज ३ GB डेटा; BSNL ने आणला स्वस्त प्लॅन...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 13:32 IST2025-08-14T13:32:18+5:302025-08-14T13:32:35+5:30
BSNL ने पुन्हा एकदा आपल्या स्वस्त प्लॅनद्वारे खासगी कंपन्यांना धक्का दिला आहे.

८४ दिवसांची वैधता अन् अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज ३ GB डेटा; BSNL ने आणला स्वस्त प्लॅन...
भारत संचार निगम लिमिटेड, म्हणजेच BSNL वेगाने आपले नेटवर्क अपग्रेड करत आहे. कंपनीने देशभरात १ लाख नवीन ४जी/५जी मोबाइल टॉवर्स बसवले आहेत. याशिवाय कंपनी १ लाख नवीन टॉवर बसवणार आहे. यासोबतच, BSNL आपल्या स्वस्त रिचार्ज प्लॅनद्वारे नवीन ग्राहकांना आकर्षित करत आहे. कंपनीने अलिकडच्या काळात अनेक स्वस्त रिचार्ज प्लॅन्स लॉन्च केले आहेत, ज्यामध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि मोफत एसएमएस सारखे फायदे मिळतात. आता कंपनीने ८४ दिवसांचा आणखी एक स्वस्त प्लॅन जाहीर केला आहे, ज्यामध्ये दररोज ३ जीबी डेटा उपलब्ध आहे.
५९९ रुपयांचा प्लॅन
बीएसएनएलने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरु हा नवीन प्लॅन जाहीर केला आहे. कंपनीने त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले की, ६०० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. तसेच, ८४ दिवसांच्या वैधतेसह हा स्वस्त रिचार्ज प्लॅन दररोज ३ जीबी हाय स्पीड डेटा देतो. यासोबतच, मोफत राष्ट्रीय रोमिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएस देखील मिळतात.
बीएसएनएल त्यांच्या ५९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये युजरला बीआयटीव्हीचा मोफत अॅक्सेस देत आहे. याद्वारे ४०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल्स पाहता येतात. शिवाय, यात अनेक ओटीटी अॅप्सचा अॅक्सेसदेखील मिळतो.
बीएसएनएलचा १ रुपयांचा प्लॅन
बीएसएनएलने १ रुपयांचा नवीन प्लॅन जाहीर केला आहे. कंपनी १ रुपयांच्या या प्लॅनमध्ये ३० दिवसांची वैधता देत आहे. या फ्रीडम प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि संपूर्ण भारतातील कोणत्याही नंबरवर मोफत राष्ट्रीय रोमिंगचा फायदा मिळेल. तसेच, दररोज २ जीबी डेटा आणि १०० मोफत एसएमएसचा लाभ देखील मिळतो. हा प्लॅन विशेषतः नवीन बीएसएनएल ग्राहकांसाठी आहे. ३१ ऑगस्ट २०२५ पूर्वी नवीन बीएसएनएल सिम खरेदी करणाऱ्यांना या ऑफरचा फायदा मिळेल.