BSNL चा शानदार प्लॅन, ग्राहकांना मिळेल दरमहा 5000 GB डेटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 19:04 IST2024-12-21T18:20:57+5:302024-12-21T19:04:26+5:30

इंटरनेटच्या जास्त वापरामुळे काहीवेळा मोबाइल प्लॅनमध्ये उपलब्ध डेटा देखील कमी होतो.

bsnl 5000gb data offer with free ott subscriptions jio airtel got big shock | BSNL चा शानदार प्लॅन, ग्राहकांना मिळेल दरमहा 5000 GB डेटा

BSNL चा शानदार प्लॅन, ग्राहकांना मिळेल दरमहा 5000 GB डेटा

नवी दिल्ली : सध्याच्या डिजिटल काळात स्मार्टफोन आणि इंटरनेट ही एक आवश्यक गोष्ट बनली आहे. इंटरनेटचा वापर आता इतका वाढला आहे की, त्याशिवाय काही तासही जगणे कठीण झाले आहे. कॉलिंग, चॅटिंगपासून शॉपिंग, शिक्षण आणि मनोरंजन अशा अनेक कामांसाठी इंटरनेट आवश्यक आहे. 

इंटरनेटच्या जास्त वापरामुळे काहीवेळा मोबाइल प्लॅनमध्ये उपलब्ध डेटा देखील कमी होतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एका रिचार्ज प्लानबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये ग्राहकांना दर महिन्याला 5000GB डेटा मिळतो. दरम्यान, बीएसएनएलने आपल्या करोडो ग्राहकांसाठी एक प्लॅन आणला आहे. ज्यामध्ये एका महिन्यात 5000GB डेटा दिला जात आहे. या प्लॅनद्वारे सरकारी टेलिकॉम कंपनीने पुन्हा एकदा जिओ आणि एअरटेल सारख्या खाजगी कंपन्यांना मोठा झटका दिला आहे.

ज्या बीएसएनएल रिचार्ज प्लॅनबद्दल बोलत आहोत, तो ब्रॉडबँड प्लॅनचा (BSNL Broadband Plan) भाग आहे. जर तुम्हाला मोबाईल डेटा वारंवार संपल्यामुळे समस्या निर्माण होत असेल तर तुम्ही ब्रॉडबँड प्लॅनकडे जाऊ शकता. ब्रॉडबँड प्लॅन घेऊन तुम्ही कमी खर्चात हाय स्पीड अनलिमिटेड डेटा वापरू शकता. तुम्ही दररोज 100GB पेक्षा जास्त डेटा वापरत असला तरीही, तुम्ही पॅकमध्ये उपलब्ध डेटा पूर्णपणे संपवू शकणार नाही.

बीएसएनएलच्या पोर्टफोलिओमध्ये ग्राहकांसाठी अनेक प्रकारचे स्वस्त आणि महागडे प्लॅन मिळत आहेत. तुमच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार तुम्ही कोणताही प्लॅन निवडू शकता. ज्या बीएसएनएल प्लॅनबद्दल बोलत आहोत, त्याची मासिक किंमत 2799 रुपये आहे. या किंमतीत ते अनेक उत्तम ऑफर्स देत आहे.

बीएसएनएलच्या या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये तुम्हाला 300Mbps चा स्पीड मिळतो. याचा अर्थ, आपण कोणत्याही तणावाशिवाय अवजड काम सहजपणे करू शकता. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड डेटा मिळेल. तुम्ही 5000GB डेटा वापरत असलात तरीही, त्यानंतर तुम्ही 30Mbps च्या वेगाने इंटरनेट डेटा वापरू शकाल.

Free Ott सब्सक्रिप्शन
बीएसएनएलचा हा ब्रॉडबँड प्लॅन, जो जिओ एअरटेलचे टेन्शन वाढवत आहे, सोबतच उत्तम OTT फायदेही देतो. या कंपनीमध्ये, ग्राहकांना डिस्ने प्लस हॉटस्टार, लायन्स गेट, वूट ॲप, सोनी लिव्ह प्रीमियम, झी 5 प्रीमियम, हंगामा तसेच शेमारू मी आणि याप टीव्हीसह अनेक ॲप्सचे विनामूल्य सदस्यता मिळते. याचा अर्थ असा की, बीएसएनएल तुम्हाला अनलिमिटेड डेटा देत नाही तर ओटीटीच्या स्वतंत्र खर्चातही बचत करत आहे.
 

Web Title: bsnl 5000gb data offer with free ott subscriptions jio airtel got big shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.