Dharmaveer: एका तिकिटावर दोघांना बघता येणार ‘धर्मवीर’; Bookmyshow ची भन्नाट ऑफर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 12:47 IST2022-05-16T12:27:27+5:302022-05-16T12:47:11+5:30

Bookmyshow वर अनेक ऑफर्स सुरु असतात. आता एका ऑफर अंतर्गत तुम्ही एका तिकिटावर एक तिकीट मोफत मिळवू शकता.  

Bookmyshow Buy One Get One Free Offer Watch Dharmaveer For Free  | Dharmaveer: एका तिकिटावर दोघांना बघता येणार ‘धर्मवीर’; Bookmyshow ची भन्नाट ऑफर  

Dharmaveer: एका तिकिटावर दोघांना बघता येणार ‘धर्मवीर’; Bookmyshow ची भन्नाट ऑफर  

महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. रोजच्या गरजेच्या वस्तू तर महाग होत आहेतच त्याचबरोबर करमणूक देखील महागली आहे. अशात जर तुम्ही याच आठवड्यात आलेला मराठी चित्रपट ‘धर्मवीर’ बघण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला महागडे तिकिट्स विकत घ्याव्या लागतील. यावर तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म Bookmyshow नं एक जबरदस्त ऑफर सादर केली आहे. त्यामुळे तुम्ही एका तिकिटाचे पैसे देऊन दोन तिकिटं मिळवू शकता.  

Bookmyshow Buy one Get one Offer 

मराठीत धर्मवीर आणि चंद्रमुखी असे चित्रपट जोरदार कामगिरी करत आहेत. त्यामुळे तुम्ही हे चित्रपट बघण्याचा विचार करत असाल तर बुकमायशो तुमच्यासाठी शानदार ऑफर घेऊन आला आहे. इथे तुम्ही दोन तिकिट्स बुक केल्यास तुमच्या एका तिकिटाचे माफ होतील. यासाठी तुम्हाला फक्त IndusInd बँकेच्या डेबिट कार्डचा वापर करून तिकीट बुक करताना पेमेंट करावं लागेल.  

IndusInd च्या डेबिट कार्डनं बुकिंग केल्यास तुमहाला एक तिकीट मोफत मिळेल. ही ऑफर 31 ऑगस्ट 2022 पर्यंत वैध असेल. तसेच IndusInd बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास रुपयांचा जास्तीत जास्त 250 रुपयांचा डिस्काउंट आणि फूड कॉम्बो देखील मिळेल. ही ऑफर ऑफर 31 मार्च 2023 पर्यंत वापरता येईल.  

अन्य ऑफर  

Bookmyshow वर मुव्ही तिकीट बुक करताना WinPin हा कोड वापरावा लागेल. हा कोड वापरून पेमेंट केल्यास तुम्हाला डिस्काउंट मिळेल. ही ऑफर फक्त पहिल्यांदा तिकीट बुक करताना देण्यात येईल.  

Web Title: Bookmyshow Buy One Get One Free Offer Watch Dharmaveer For Free