आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 19:12 IST2025-10-06T19:11:49+5:302025-10-06T19:12:36+5:30
Bihar Elections 2025: २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, निवडणूक आयोगाने मतदानाचे आणि निकालाचे वेळापत्रक जाहीर केले.

आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, निवडणूक आयोगाने मतदानाचे आणि निकालाचे वेळापत्रक जाहीर केले. बिहारमधील २४३ विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान दोन टप्प्यात होणार आहे, तर निवडणुकीचे निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होतील.
निवडणूक आयोगाने या निवडणुकीत तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करण्याचा निर्णय घेतला असून, मतदार आणि उमेदवारांसाठी चार महत्त्वाचे ॲप्स आणि पोर्टल्स लॉन्च केले आहेत. या डिजिटल साधनांमुळे निवडणुकीशी संबंधित सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
VHA: हे अॅप विशेषतः मतदारांसाठी तयार करण्यात आले आहे. याच्या माध्यमातून मतदार आपल्या नावाची मतदार यादीतील नोंद तपासू शकतात. त्याचबरोबर मतदान केंद्राची माहिती, बीएलओशी संपर्क, मतदार ओळखपत्रातील दुरुस्तीचे फॉर्म तसेच ई-ईपीआयसी डाउनलोड करण्याची सुविधाही यात उपलब्ध आहे.
cVigil: मतदानादरम्यान कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांची तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगाने cVigil हे अॅप विकसित केले आहे. यामध्ये नागरिक कोणतीही तातडीची तक्रार नोंदवू शकतात आणि आयोग त्या तक्रारीवर १०० मिनिटांच्या आत कार्यवाही करतो.
KYC: मतदारांना त्यांच्या मतदारसंघातील उमेदवारांची माहिती मिळावी यासाठी KYC अॅप उपयुक्त ठरते. उमेदवारांचे शैक्षणिक पात्रता, गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि संपत्ती यांची माहिती यावर मिळू शकते.
सुविधा पोर्टल व सुविधा २.० अॅप: हे अॅप आणि पोर्टल मुख्यतः निवडणुकीतील उमेदवारांसाठी डिझाइन करण्यात आले आहे. याद्वारे उमेदवार नामांकनपत्र व शपथपत्रे ऑनलाइन दाखल करू शकतात. तसेच प्रचारासाठी परवानग्या, रॅलीचे आयोजन यासाठीही याचा वापर करता येतो.