३० मार्च लक्षात ठेवा, अलार्म लावा! अवघ्या १६ रुपयांत दोन डिस्प्लेवाला स्मार्टफोन अन् स्मार्टवॉच; ३१ मार्चपूर्वी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 19:30 IST2025-03-28T19:30:33+5:302025-03-28T19:30:52+5:30
तुम्ही विचार कराल की एवढ्या कमी किंमतीत कसा काय, तर कंपनीनेच याची घोषणा केली आहे. पहिल्या १०० लोकांना या १६ रुपयांच्या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. हे एवढे कठीनही नाहीय आणि सोपेही.

३० मार्च लक्षात ठेवा, अलार्म लावा! अवघ्या १६ रुपयांत दोन डिस्प्लेवाला स्मार्टफोन अन् स्मार्टवॉच; ३१ मार्चपूर्वी...
३१ मार्चपूर्वी आर्थिक ताळेबंद ठीक करत असताना एक मोठी ऑफर आली आहे. तुम्हाला १६ रुपयांत दोन डिस्प्लेवाला स्मार्टफोन आणि १६ रुपयांत स्मार्टवॉच घेण्याची संधी चालून आली आहे. भारतीय स्मार्टफोन कंपनी लावाने ही भन्नाट ऑफर जाहीर केली आहे. यामध्ये त्यांचा प्रिमिअम अग्नी ३ स्मार्टफोन आणि Prowatch V1 स्मार्टवॉच अवघ्या १६ रुपयांना दिले जाणार आहे.
तुम्ही विचार कराल की एवढ्या कमी किंमतीत कसा काय, तर कंपनीनेच याची घोषणा केली आहे. पहिल्या १०० लोकांना या १६ रुपयांच्या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. हे एवढे कठीनही नाहीय आणि सोपेही. कारण तुम्ही दोन वेगवेगळ्या वेळी या ऑफरसाठी अप्लाय करू शकणार आहात. स्मार्टफोनसाठी ही ऑफर दुपारी डॉट १२ वाजता सुरु होणार आहे. तर स्मार्टवॉचसाठी सायंकाळी सात वाजता सेल सुरु होणार आहे.
म्हणजेच तुम्ही स्मार्टफोन घेण्यास हुकलात तर स्मार्टवॉचसाठी तुम्ही लक आजमवू शकता. Lava AGNI 3 मध्ये स्क्रीन ६.७८ इंचाची आहे. तर दुसरी स्क्रीन फोनच्या मागील बाजूस कॅमेऱ्यांजवळ आहे. मीडियाटेक डायमेन्सिटी ७३००एक्स ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. लावा अग्नि ३ मध्ये ५०००mAh ली-पो बॅटरी आहे जी ६६W सुपर फास्ट चार्जिंगसह येते. या फोनची लॉटरी लागली तर तुम्हाला चार्जर मात्र बाहेरून विकत घ्यावा लागेल.
लावा प्रोवॉच व्ही१ नुकतेच लाँच केले गेले होते. मूळ किंमत २,३९९ रुपये आहे. १.८५ इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. Realtek 8773 चिपसेट असून यामध्ये जीपीएस सपोर्ट देण्यात आला आहे. लोकेशन ट्रॅकिंगची सुविधा देखील आहे. तसेच ११० हून अधिक स्पोर्ट्स मोड्स देण्यात आले आहेत. मग वाट कसली पाहताय, आधी अलार्म सेट करून ठेवा, म्हणजे तुम्ही या संधीचा लाभ घेऊ शकणार आहात.