सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 17:55 IST2026-04-04T17:54:49+5:302026-04-04T17:55:29+5:30

तुमच्या नावावर घेतलेले सिम कार्ड जर सायबर फसवणूक किंवा इतर गुन्ह्यांत वापरले गेले तर तुम्हाला कायदेशीररीत्या जबाबदार धरले जाऊ शकते.

Beware! Wrong person's SIM card on your Aadhaar card? One mistake and direct police custody | सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी

सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी

बनावट कागदपत्रांच्या आधारे दुसऱ्यांच्या नावावर अनेक सिम कार्ड घेऊन गुन्हेगारी कृत्ये करण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच तुमच्या नावावर घेतलेले सिम कार्ड जर सायबर फसवणूक किंवा इतर गुन्ह्यांत वापरले गेले तर तुम्हाला कायदेशीररीत्या जबाबदार धरले जाऊ शकते. आपल्या नावावर किती सिम कार्ड आहेत, हरवलेला किंवा चोरी झालेला मोबाइल ब्लॉक करणे 'संचार साथी' पोर्टलच्या माध्यमातून करता येते.

तुमच्या नावावर दुसराच वापरतोय सिम कार्ड 

नवे सिम कार्ड घेण्यासाठी ग्राहक आपले आधारकार्ड, पॅनकार्ड, ओळखीचा पुरावा ही कागदपत्रे देतो. त्यानंतर ग्राहकाला सिम कार्ड दिले जाते. मात्र आपल्या कागदपत्रांचा वापर करून सिम कार्ड घेतो. मात्र सिम कार्ड तुमच्या नावावर आणि वापर दुसराच करीत असतो.

गुन्हेगारी कृत्यांसाठी सिमचा वापर वाढला

नवे सिम कार्ड घेताना आपण कागदपत्रे दुकानदाराला देतो. याच कागदपत्रांचा वापर करून काही जण आपल्या नावावर सिम कार्ड घेतात. या सिमद्वारे गुन्हेगारी कृत्ये करून आपल्याला अडचणीत असतात. सध्या हा प्रकार वाढत चालला आहे.

दुसऱ्याला सिम द्याल तर तुम्हीही गोत्यात याल

तुमच्या नावावर घेतलेले सिम कार्ड दुसऱ्या व्यक्तीला वापरण्यासाठी देणे कायदेशीररित्या अत्यंत धोकादायक आहे, ज्यामुळे तुम्हाला गंभीर शिक्षेला सामोरे जावे लागू शकते. टेलिकम्युनिकेशन कायदा २०२३ नुसार, तुमच्या नावावरील सिमचा गैरवापर झाल्यास तो गुन्हा मानला जातो.

आधार, पॅन कार्ड, किंवा इतर महत्त्वाची कागदपत्रे कोणालाही देताना ती कशासाठी घेतली जात आहेत, याची स्पष्ट कल्पना घ्या. झेरॉक्स प्रतींवर (स्वयं-साक्षांकित) करताना त्या कागदपत्रांचा हेतू स्पष्ट लिहा, अन्यथा तुमच्या नावावर कर्ज किंवा फसवणुकीचे प्रकार घडू शकतात.

नावावरील सिम कार्ड संचारसाथी पोर्टलवर चेक करा

तुमच्या नावावर किती सिम कार्ड कार्यरत आहेत हे तपासण्यासाठी भारत सरकारच्या संचार साथी पोर्टलचा sancharsaathi.gov.in वापर करा. 'Know Your Mobile Connections' विभागात जाऊन मोबाइल नंबर आणि ओटीपीद्वारे लॉगिन करून तुम्ही यादी पाहू शकता आणि अनोळखी नंबरची तक्रार करून ते बंदही करू शकता.

संचारसाथी पोर्टलवर इतर कोणकोणत्या सुविधा ?

संचारसाथी पोर्टल हे भारत सरकारचे दूरसंचार विभागद्वारे विकसित केलेले एक अत्यंत महत्त्वाचे पोर्टल आहे, जे मोबाइल वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी अनेक सुविधा पुरवते. यावर प्रामुख्याने हरवलेला फोन ब्लॉक करणे, आपल्या नावावरील सिम कार्ड तपासणे, आणि सायबर फ्रॉडची तक्रार करणे यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे सिम संदर्भातील कोणतीही समस्या आढळल्यास या पोर्टलद्वारे त्याचे निवारण करणे शक्य होते.

Web Title : सावधान! आपके आधार पर धोखाधड़ी वाले सिम कार्ड हो सकते हैं

Web Summary : आपके आधार से जुड़े धोखाधड़ी वाले सिम कार्ड कानूनी परेशानी का कारण बन सकते हैं। दुरुपयोग और संभावित आपराधिक दायित्व से बचने के लिए संचार साथी पोर्टल पर अपने सक्रिय सिम की जांच करें। किसी भी अज्ञात नंबर की तुरंत रिपोर्ट करें।

Web Title : Beware! Your Aadhaar Could Be Used for Fraudulent SIM Cards

Web Summary : Fraudulent SIM cards linked to your Aadhaar can lead to legal trouble. Check your active SIMs on the Sanchar Saathi portal to avoid misuse and potential criminal liability. Report any unknown numbers immediately.