UPI युजर्ससाठी अलर्ट! QR कोड स्कॅन करण्यापूर्वी 'हे' करा चेक, होऊ शकतं मोठं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 08:55 IST2024-12-26T08:54:08+5:302024-12-26T08:55:12+5:30
डिजिटल पेमेंट करणं खूप सोपं आहे आणि त्यात कॅश सोबत ठेवण्याची गरज नाही. मात्र, हे सोपं काम काहीसं धोक्याचंही आहे.

UPI युजर्ससाठी अलर्ट! QR कोड स्कॅन करण्यापूर्वी 'हे' करा चेक, होऊ शकतं मोठं नुकसान
आजकाल मोठ्या संख्येने लोक UPI द्वारे पेमेंट करत आहेत. पेट्रोल पंपापासून ते रेस्टॉरंटपर्यंत लोक कॅश ऐवजी डिजिटल व्यवहार करत आहेत. डिजिटल पेमेंट करणं खूप सोपं आहे आणि त्यात कॅश सोबत ठेवण्याची गरज नाही. मात्र, हे सोपं काम काहीसं धोक्याचंही आहे. QR कोड स्कॅन करताना फसवणूक होण्याची शक्यता असते. यामध्ये फसवणूक करणारे खऱ्या कोडऐवजी बनावट क्यूआर कोड स्कॅन लावतात. हा एक स्कॅम आहे, ज्यामध्ये तुमचं अकाऊंट रिकामं केलं जाईल.
कसा होतो QR कोडद्वारे स्कॅम?
अनेक वेळा असं घडतं, जेव्हा लोक घाईघाईने QR कोड तपासल्याशिवाय स्कॅन करतात. अशा लोकांवर स्कॅमर्सची नजर असते. अनेक वेळा फसवणूक करणारे मूळ कोडऐवजी बनावट QR कोड स्कॅन करून घेतात. हे स्कॅन झाल्यावर त्यांचं काम सुरू होतं. स्कॅनरला वाटतं की, तो पेमेंटसाठी स्कॅन करत आहे, परंतु प्रत्यक्षात तो मालवेअर असलेली फाइल इन्स्टॉल करण्यासाठी कोड स्कॅन करत आहे.
एकदा लिंक स्कॅन केल्यावर, हॅकर्स फोनवर प्रोग्राम इन्स्टॉल करून सर्व आवश्यक माहिती गोळा करू शकतात. यामध्ये पर्सनल माहिती ते बँक अकाऊंटपर्यंतची माहिती असू शकते. ही माहिती मिळाल्यास हॅकर्स काही सेकंदात बँक अकाऊंट रिकामं करू शकतात. काही दिवसांपूर्वी पुण्यात एका पोलीस कर्मचाऱ्यासोबत असाच एक स्कॅम झाला होता, त्यात त्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालं होतं.
अशा प्रकारे सावध राहा
- QR कोड स्कॅन करण्यापूर्वी युजर्सचं नाव आणि इतर माहिती चेक करा. संशयास्पद लोक आणि ठिकाणी QR कोड स्कॅन करू नका.
- कोणताही डिजिटल व्यवहार करताना घाई करू नका. प्रत्येक लिंक किंवा प्लॅटफॉर्म चेक करा आणि नंतर पुढे जा.
- नेहमी अधिकृत ॲप्स फक्त डिजिटल व्यवहारांसाठी वापरा. ते फक्त Google Play Store आणि Apple App Store सारख्या विश्वसनीय स्टोअरमधून डाउनलोड करा.