सावधान! ChatGPT, AIची एक मदत अन् बँक खातं होईल रिकामं; चुकूनही करू नका 'हे' काम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 12:49 IST2026-03-06T12:45:38+5:302026-03-06T12:49:17+5:30

तुम्ही देखील 'या' गोष्टी करण्यासाठी एआयची मदत घेत असाल, तर सावधान! तुमची ही एक सवय तुमचे बँक खाते पूर्णपणे रिकामे करू शकते.

Beware! ChatGPT, a help from AI and your bank account will be empty; Don't do 'this' thing by mistake! | सावधान! ChatGPT, AIची एक मदत अन् बँक खातं होईल रिकामं; चुकूनही करू नका 'हे' काम!

सावधान! ChatGPT, AIची एक मदत अन् बँक खातं होईल रिकामं; चुकूनही करू नका 'हे' काम!

आजच्या युगात घरच्या कामापासून ते ऑफिसच्या प्रोजेक्टपर्यंत आपण सर्रास ChatGPT किंवा इतर एआय चॅटबॉट्सची मदत घेतो. कठीण प्रश्नांची उत्तरे शोधणे असो किंवा ईमेल लिहिणे, एआय सर्वकाही चुटकीसरशी करते. मात्र, जर तुम्ही तुमच्या बँक खात्याचा किंवा सोशल मीडियाचा पासवर्ड तयार करण्यासाठी एआयची मदत घेत असाल, तर सावधान! तुमची ही एक सवय तुमचे बँक खाते पूर्णपणे रिकामे करू शकते.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

एआयच्या पासवर्डमध्ये दडलंय मोठं गुपित!

नुकत्याच एका संशोधनातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपण जेव्हा एआयला स्ट्रॉन्ग पासवर्ड तयार करायला सांगतो, तेव्हा ते दिसायला जरी कठीण वाटत असले, तरी त्यामागे एक ठराविक पॅटर्न असतो. सायबर गुन्हेगार अशा पॅटर्नचा सहज अंदाज लावू शकतात. संशोधनानुसार, Claude, ChatGPT आणि Gemini सारखे एआय मॉडेल्स पुन्हा पुन्हा तेच किंवा त्यासारखेच पासवर्ड तयार करतात.

संशोधनातील धक्कादायक आकडेवारी

Claude AI: या एआयने तयार केलेल्या ५० पासवर्डपैकी केवळ २३ पासवर्ड वेगळे होते. बाकी सर्व पासवर्डमध्ये एकसारखेपणा होता. इतकेच नाही तर, 'K9#mPx$vL2nQ8wR' हा एकच पासवर्ड चक्क १० वेळा रिपीट झाला.

ChatGPT: चॅटजीपीटीने तयार केलेले पासवर्ड दिसायला क्लिष्ट असले, तरी त्यांच्या रचनेत कमालीचे साम्य आढळले आहे.

रँडम नंबरचा खेळ अन् तुमचा धोका!

एआय नक्की काम कसं करतं? जेव्हा तुम्ही एआयला एखादा रँडम नंबर किंवा पासवर्ड विचारात, तेव्हा ते त्याच्या डेटाबेसमधील 'सर्वात जास्त संभाव्य' अर्थात मोस्ट लाईकली उत्तर देते. तुम्ही जर वेगवेगळ्या चॅटमध्ये पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारला, तर एआय अनेकदा तोच नंबर किंवा पासवर्ड पुन्हा जनरेट करते. हेच सायबर हल्लेखोरांचे काम सोपे करते.

बँक खाते होऊ शकते साफ!

आजकाल आपले संपूर्ण आर्थिक व्यवहार मोबाईलवर चालतात. बँकिंग ॲप्स, यूपीआय आणि इंटरनेट बँकिंगसाठी जर तुम्ही एआयने दिलेला कमकुवत किंवा सहज अंदाज लावता येईल असा पासवर्ड वापरला, तर सायबर अटॅकचा धोका कैकपटीने वाढतो. हॅकर्स अल्गोरिदमचा वापर करून अशा पासवर्डचा शोध घेतात आणि क्षणात तुमचे खाते साफ करू शकतात.

काय काळजी घ्याल?

तज्ज्ञांच्या मते, पासवर्ड तयार करण्यासाठी कधीही कोणत्याही एआय चॅटबॉटचा वापर करू नका. त्याऐवजी स्वतःचे युनिक पासवर्ड तयार करा किंवा विश्वासार्ह 'पासवर्ड मॅनेजर'चा वापर करा. लक्षात ठेवा, तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला कंगाल करू शकते. 

Web Title : सावधान! AI से बने पासवर्ड खाली कर सकते हैं आपका बैंक खाता!

Web Summary : AI द्वारा बनाए गए पासवर्ड, दिखने में जटिल होने पर भी, अक्सर अनुमान लगाने योग्य होते हैं। बैंकिंग ऐप्स के लिए इनका उपयोग साइबर हमलों का खतरा बढ़ाता है, जिससे आपका खाता खाली हो सकता है। अद्वितीय पासवर्ड बनाएं या विश्वसनीय पासवर्ड प्रबंधक का उपयोग करें।

Web Title : Warning! AI-generated passwords can empty your bank account; be cautious!

Web Summary : AI-generated passwords, though complex-looking, often have predictable patterns. Using them for banking apps increases the risk of cyberattacks, potentially emptying your account. Create unique passwords or use a reliable password manager instead.