जर तुम्ही इंटरनेट सर्फिंगसाठी 'मोझिला फायरफॉक्स' किंवा ईमेलसाठी 'थंडरबर्ड' वापरत असाल, तर सावधान! भारत सरकारच्या सायबर सुरक्षा एजन्सीने या युजर्ससाठी 'हाय रिस्क' अलर्ट जारी केला आहे. या ब्राउझरच्या जुन्या व्हर्जनमध्ये अशा काही गंभीर त्रुटी आढळल्या आहेत, ज्याचा फायदा घेऊन हॅकर्स तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलचा ताबा घेऊ शकतात.
सरकारने का दिला धोक्याचा इशारा?
इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम म्हणजेच 'CERT-In'ने जानेवारी २०२६च्या आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे की, फायरफॉक्सच्या सुरक्षा यंत्रणेत काही तांत्रिक बग आहेत. यामुळे एखादा सायबर हल्लेखोर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून तुमच्या सिस्टमवर हल्ला करू शकतो. ही समस्या इतकी गंभीर आहे की, यामुळे तुमचे पासवर्ड, वैयक्तिक माहिती आणि ब्राउझिंग डेटा चोरीला जाण्याची मोठी शक्यता आहे.
हॅकर्स कसा करतात शिकार?
अहवालानुसार, फायरफॉक्सच्या अँटी-ट्रॅकिंग आणि लेआउट स्क्रोलिंग सारख्या घटकांमध्ये तांत्रिक दोष आहेत. हॅकर्स युजर्सना एखादी विशेष लिंक किंवा वेब रिक्वेस्ट पाठवून ती क्लिक करण्यास भाग पाडतात. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करताच, तुमच्या सिस्टममधील गोपनीय माहिती हॅकर्सच्या सर्व्हरवर पोहोचते. काही प्रकरणांमध्ये तर युजरचे सिस्टम पूर्णपणे क्रॅश देखील होऊ शकते.
तुमच्याकडे हे व्हर्जन तर नाही ना?
जर तुम्ही खालीलपैकी कोणतेही जुने व्हर्जन वापरत असाल, तर तुम्ही धोक्याच्या गर्तेत आहात:
Firefox: १४७.०.२ पेक्षा जुने व्हर्जन.
Thunderbird: १४०.७.१ आणि १४७.०.१ पेक्षा जुने व्हर्जन.
जे युजर्स दीर्घकाळापासून आपले ब्राउझर अपडेट करत नाहीत, त्यांना हॅकर्स सहज लक्ष्य करत आहेत.
बचावासाठी काय करावे?
१. तात्काळ अपडेट करा: तुमच्या कॉम्प्युटरवरील फायरफॉक्सच्या 'Settings' मध्ये जाऊन 'About Firefox' वर क्लिक करा आणि नवीन अपडेट इन्स्टॉल करा. मोबाईल युजर्सनी प्ले स्टोअरवरून अपडेट घ्यावे.
२. अनोळखी लिंक टाळा: व्हॉट्सॲप किंवा ईमेलवर आलेल्या कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका.
३. थर्ड पार्टी एक्सटेंशन नको: अनधिकृत वेबसाइटवरून कोणतेही ॲप किंवा ब्राउझर एक्सटेंशन डाऊनलोड करू नका.
Web Summary : The Indian government warns Firefox and Thunderbird users of critical vulnerabilities. Hackers can exploit older versions to steal data. Update immediately, avoid suspicious links, and use official extensions for safety.
Web Summary : भारत सरकार ने Firefox और Thunderbird उपयोगकर्ताओं को गंभीर कमजोरियों के प्रति आगाह किया है। हैकर्स डेटा चुराने के लिए पुराने संस्करणों का फायदा उठा सकते हैं। तुरंत अपडेट करें, संदिग्ध लिंक से बचें और सुरक्षा के लिए आधिकारिक एक्सटेंशन का उपयोग करें।