टेलिकॉम क्षेत्रात मोठी उलथापालथ! 5G अनुभवाच्या बाबतीत Vi ने मारली बाजी; जिओ आणि एअरटेलला टाकले मागे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 18:24 IST2026-02-08T18:23:04+5:302026-02-08T18:24:17+5:30
Vi vs Jio vs Airtel: 5G व्हिडिओ आणि गेमिंग अनुभवामध्ये व्होडाफोन-आयडिया अव्वल. OpenSignal Report 2026 मध्ये Vi ची मोठी कामगिरी. सविस्तर वाचा.

टेलिकॉम क्षेत्रात मोठी उलथापालथ! 5G अनुभवाच्या बाबतीत Vi ने मारली बाजी; जिओ आणि एअरटेलला टाकले मागे
नवी दिल्ली: भारतीय टेलिकॉम मार्केटमध्ये सध्या रिलायन्स जिओ आणि एअरटेल यांची मक्तेदारी असल्याचे मानले जाते. मात्र, एका ताज्या अहवालाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. 'OpenSignal' च्या २०२६ च्या अहवालानुसार, व्होडाफोन-आयडियाने चक्क 5G व्हिडिओ स्ट्रीमिंग, गेमिंग आणि व्हॉइस ॲप अनुभवाच्या बाबतीत दिग्गज कंपन्यांना मागे टाकले आहे.
OpenSignal कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या 'इंडिया मोबाइल नेटवर्क एक्सपिरियन्स रिपोर्ट' नुसार, व्होडाफोन-आयडियाने तीन महत्त्वाच्या श्रेणींमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. 5G व्हिडिओ एक्सपिरियन्स युजर्सना अखंड आणि हाय-डेफिनिशन व्हिडिओ पाहताना Vi वर सर्वोत्तम अनुभव मिळाला. मल्टीप्लेअर गेमिंगसाठी आवश्यक असणारा कमी लॅग आणि वेगवान रिस्पॉन्स Vi च्या नेटवर्कवर अधिक चांगला दिसून आला. व्हॉट्सॲप किंवा स्काईप सारख्या ॲप्सवरून कॉल करताना आवाजाची स्पष्टता Vi मध्ये जास्त आढळली.
जिओ आणि एअरटेलचे काय?
जरी Vi ने अनुभवाच्या बाबतीत बाजी मारली असली, तरी 5G उपलब्धता आणि कव्हरेज मध्ये रिलायन्स जिओ अजूनही नंबर वन आहे. एअरटेलने ५जी डाऊनलोड स्पीडमध्ये आपली पकड मजबूत ठेवली आहे. मात्र, युजर एक्सपिरियन्सच्या बाबतीत Vi ने घेतलेली ही झेप टेलिकॉम तज्ज्ञांसाठी चर्चेचा विषय ठरली आहे.
Vi कडे युजर्सचा ओढा वाढणार?
गेल्या काही काळापासून आर्थिक संकटात असलेल्या व्होडाफोन-आयडियासाठी हा अहवाल म्हणजे एक मोठी संजीवनी आहे. आपल्या सेवांचा दर्जा सुधारल्यामुळे आता पुन्हा एकदा प्रीमियम युजर्स Vi कडे वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.