आता फ्रॉडचं नो टेन्शन! पेमेंट करण्यापूर्वी फॉलो करा 'ही' सरकारी ट्रिक; कोणीही घालणार नाही गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 13:59 IST2025-05-20T13:57:05+5:302025-05-20T13:59:13+5:30
तुम्हाला स्कॅमर्सकडून फसवणूक करण्याच्या नवीन पद्धतींची भीती बाळगण्याची गरज राहणार नाही.

आता फ्रॉडचं नो टेन्शन! पेमेंट करण्यापूर्वी फॉलो करा 'ही' सरकारी ट्रिक; कोणीही घालणार नाही गंडा
कधी बनावट कॉल्सद्वारे, कधी बनावट UPI लिंक्सद्वारे, स्कॅमर दररोज नवीन मार्गांनी लोकांना फसवत आहेत. जर तुम्हालाही काळजी वाटत असेल की, या स्कॅमर्सच्या काही नवीन युक्ती तुम्हाला अडकवू शकतात आणि तुमचा बँक बॅलन्स रिकामा करू शकता. तर आता काळजी करण्याचं टेन्शन नाही. सर्व प्रकारच्या ऑनलाईन फसवणुकीपासून स्वतःला वाचवण्यासाठी एक नवी ट्रिक समोर आली आहे. हे जाणून घेतल्यानंतर तुम्हाला स्कॅमर्सकडून फसवणूक करण्याच्या नवीन पद्धतींची भीती बाळगण्याची गरज राहणार नाही.
ऑनलाईन पेमेंट फसवणूक तेव्हा होते जेव्हा एखादा फसवणूक करणारा तुम्हाला बनावट कॉल, मेसेज किंवा लिंक्सद्वारे फसवतो आणि तुमचा बँक बॅलन्स रिकामा करतो. अनेक वेळा हे लोक बँक कर्मचारी, कस्टमर केअर किंवा डिलिव्हरी एजंट असल्याचे भासवतात आणि OTP किंवा UPI पिन विचारतात. कधीकधी ते तुम्हाला QR कोड पाठवतात आणि म्हणतात की तो स्कॅन केल्याने पैसे मिळतील असं सांगतात. बनावट वेबसाईट्स किंवा अॅप्सद्वारे लोक सहजपणे फसले जातात. जर तुम्ही एखाद्या अनोळखी लिंकवर क्लिक केलं किंवा ती न तपासता पेमेंट केलं तर फसवणुकीची शक्यता वाढते.
एनसीसीआरपी म्हणजेच नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल कोणत्याही प्रकारच्या पेमेंट फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. हे तुम्हाला फसवणुकीच्या क्रमांकांबद्दल तक्रार करण्याचा पर्यायच देत नाही तर तक्रारीत आढळणाऱ्या सर्व क्रमांकांची नोंद देऊन लोकांना कोणत्याही फसवणुकीपासून वाचवण्याचा प्रयत्न करतात. या सरकारी पोर्टलवरील सेवेच्या मदतीने, कोणालाही पैसे देण्यापूर्वी, तुम्ही त्या व्यक्तीचे नाव, नंबर किंवा UPI आयडीबाबत यापूर्वी कोणतीही तक्रार दाखल केली आहे की नाही हे तपासू शकता. अशा प्रकारे तुम्ही पेमेंट करण्यापूर्वी दुसऱ्या व्यक्तीची माहिती नेहमीच जाणून घेऊ शकता. हे सोप्या पद्धतीने समजून घेऊया.
जर तुम्हाला पैसे देण्यापूर्वी तपासायचे असेल की ज्या व्यक्तीला तुम्ही पैसे देणार आहात ती व्यक्ती स्कॅमर आहे की नाही यासाठी तुम्ही काही गोष्टी फॉलो करू शकता
- सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर NCCRP शोधावं लागेल
- यासह तुम्ही सायबर क्राईमच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- वर उजवीकडे असलेल्या हॅम्बर्गर मेनूवर क्लिक करा आणि Report & Check Suspects वर क्लिक करा.
- यानंतर सस्पेक्ट रिपॉझिटरी वर क्लिक करा आणि चेक सस्पेक्टवर क्लिक करा.
- तुम्हाला संशयिताशी संबंधित जे काही तपशील असतील ते द्यावे लागतील. मोबाईल नंबर, UPI आयडी, बँक खाते क्रमांक किंवा ईमेल असं काहीही असू शकतं.
- जर तुमच्या समोरची व्यक्ती फसवणूक करणारी असेल, तर त्याची सर्व माहिती तुम्हाला दिसेल.