Battlegrounds Mobile India गेम आता iOS वर उपलब्ध; इथून करा Apple iPhone वर BGMI डाउनलोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 13:10 IST2021-08-18T13:08:55+5:302021-08-18T13:10:01+5:30
BGMI iOS: आज म्हणजे 18 ऑगस्टपासून Apple iPhone युजर देखील BGMI चा आस्वाद घेऊ शकतात. आता Apple चे iPhone, iPad आणि iPod touch वापरणारे युजर्स BGMI खेळू शकतील.

Battlegrounds Mobile India गेम आता iOS वर उपलब्ध; इथून करा Apple iPhone वर BGMI डाउनलोड
जूनमध्ये PUBG Mobile चा स्वदेशी अवतार भारतात उपलब्ध झाला होता. परंतु तेव्हापासून BGMI हा गेम फक्त अँड्रॉइड प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. अनेक वेळा टीज करूनही आयओएस युजर्सना काही चिकन डिनर मिळत नव्हता. आज मात्र गेम डेव्हलपर कंपनी KRAFTON ने या गेमचा iOS व्हर्जन देखील भारतात सादर केला आहे. आज म्हणजे 18 ऑगस्टपासून Apple iPhone युजर देखील BGMI चा आस्वाद घेऊ शकतात.
Battlegrounds Mobile India गेम क्रॉफ्टनने आजपासून आयओएस डिव्हाइसेससाठी सादर केला आहे. आता Apple चे iPhone, iPad आणि iPod touch वापरणारे युजर्स BGMI खेळू शकतील. हा बॅटल रॉयल गेम iOS 11.0 आणि त्यावरील डिव्हाइसेससाठी उपलब्ध झाला आहे. आयओएस युजर्स इथे क्लिक करून Battlegrounds Mobile India (BGMI) गेम आपापल्या Apple डिवायसमध्ये डाउनलोड आणि इन्स्टाल करू शकतील.
Battlegrounds Mobile India चे 5 कोटी डाउनलोडस पूर्ण
Battlegrounds Mobile India ने 5 कोटी डाउनलोडसचा टप्पा पार केला आहे. Krafton ने एक प्रेस रिलीजच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला कंपनीने ‘50M डाउनलोडस रिवार्ड्स इव्हेंट’ च्या अंतर्गत खेळाडूंना एक कायमस्वरूपी पोषक दिला आहे. या पोशाखाचे नाव Galaxy Messenger Set आहे. या काळात कंपनीने वाईट वर्तवणूक करणाऱ्या 1,81,000 गेमर्सना बॅन देखील केले आहे.