जबरदस्त ट्रीक! WhatsApp Call रेकॉर्ड करता येणार; अनेकांना माहित नाहीय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 13:45 IST2024-01-04T13:44:55+5:302024-01-04T13:45:11+5:30
अनेकांना व्हॉट्सअप कॉल कसा रेकॉर्ड करता येतो त्याची माहिती नाहीय.

जबरदस्त ट्रीक! WhatsApp Call रेकॉर्ड करता येणार; अनेकांना माहित नाहीय...
घरात किंवा बाहेर फाईव्ह जीमुळे धड रेंज मिळत नाहीय. इंटरनेट सुपरफास्ट झालेय परंतु, फोन केला तर आवाज अलिकडचा पलिकडे ऐकायला येत नाहीय. यामुळे अनेकजण त्रस्त झाले आहेत. यामुळे व्हॉट्सअप कॉलिंगचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. ते फुकट आहे आणि चांगलेही. परंतु, जर हे कॉल रेकॉर्ड करायचे असतील तर...
नाही व्हॉट्सअपचे कॉल रेकॉर्ड करता येत नाहीत. परंतु, एक ट्रीक आहे ती वापरली तर तुम्हाला व्हॉट्सअपवरील कॉल रेकॉर्ड करता येणार आहे. अनेकदा शिवीगाळ, धमकी दिली जाते. काहीवेळा महत्वाची माहिती असते जी कामात उपयोगी पडणारी असते. अशावेळी तो कॉल रेकॉर्ड करणे गरजेचे असते. तर कसा करतात कॉल रेकॉर्ड चला पाहुया...
अनेकांना व्हॉट्सअप कॉल कसा रेकॉर्ड करता येतो त्याची माहिती नाहीय. तुम्ही यासाठी थर्ड पार्टी अॅपचा वापर करू शकता. या अॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही कॉल रेकॉर्डिंग इनेबल करू शकता. यासाठी आम्ही काही अॅपची नावे देत आहोत. तुम्ही तुमच्या जबाबदारीवर ही अॅप डाऊनलोड करून ट्राय करून पहावीत. Cube ACR, Call Recorder, Automatic Call Recorder अशी काही अॅप प्लेस्टोअरवर उपलब्ध आहेत.
य़ा अॅप्सचे रेटिंग, विश्वासार्हता आणि अन्य गोष्टी तपासून पहाव्यात. जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही.