जबरदस्त! Jio ने लाँच केली नवी सिस्टीम; पूर, भूकंप आणि वादळातही हाय स्पीड इंटरनेट मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 03:54 PM2023-10-28T15:54:47+5:302023-10-28T16:12:42+5:30

जिओने नवीन आपत्कालीन कम्युनिकेश सिस्टीम लाँच केली आहे. याच्या मदतीने हायस्पीड इंटरनेट आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदत दिली जाणार आहे.

Awesome! Jio launches new system; High speed internet will be available even during floods, earthquakes and storms | जबरदस्त! Jio ने लाँच केली नवी सिस्टीम; पूर, भूकंप आणि वादळातही हाय स्पीड इंटरनेट मिळणार

जबरदस्त! Jio ने लाँच केली नवी सिस्टीम; पूर, भूकंप आणि वादळातही हाय स्पीड इंटरनेट मिळणार

रिलायन्स जिओने एक नवीन आपत्कालीन कम्युनिकेशन सिस्टीम लाँचे केली आहे. दिल्लीतील प्रगती मैदानावर आयोजित मोबाईल इंडिया काँग्रेसमध्ये हे प्रदर्शित करण्यात आले आहे. आपल्याकडे पूर, आग, वादळ, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळी मोबाईल, ब्रॉडबँड यांसारखे कनेक्शन बंद होतात, पण या समस्येला तोंड देण्यासाठी आपत्कालीन संपर्क यंत्रणा सुरू करण्यात आली आहे, जेणेकरून नैसर्गिक आपत्तींच्या वेळी उच्च संपर्क सेवा पुरवता येईल.स्पीड इंटरनेट उपलब्ध राहिल, ज्यामुळे दुर्गम भागात मदत करणे सोपे होईल. तसेच, त्या भागात संपर्क साधणे सोपे होईल.

TATA ग्रुप iPhone ची निर्मिती करणार; भारतासह जगभरात निर्यात होणार

इमर्जन्सी रिस्पॉन्स कम्युनिकेशन सिस्टम जिओच्या खऱ्या 5G नेटवर्कवर चालेल, यामुळे स्थानिक दळणवळण मजबूत होईल. स्थानिक दळणवळण प्रणालीमध्ये बिघाड झाल्यास, या प्रणालीमध्ये उपग्रह कनेक्टिव्हिटीसह 'कम्युनिकेशन टॉवर ऑन व्हील्स' सेटअप स्थापित करावा लागेल, जो कोणत्याही परिस्थितीत सुरू केला जाऊ शकतो.

Reliance Jio ने ‘XR Companion’ नावाचे शक्तिशाली अॅप डिझाइन केले आहे. हे अॅप तुम्हाला तुमच्या सपोर्ट टीमशी रिअल टाइममध्ये कनेक्ट ठेवेल. कमांड सेंटरमधील अॅपद्वारे कामाचे वितरण, टू-वे ऑडिओ व्हिडिओ कॉलिंग, इमर्जन्सी अॅम्ब्युलन्स कॉलिंग, टीम मूव्हमेंट, कामाच्या प्रगतीचा अहवाल रीअल टाईम मॉनिटर केला जाऊ शकतो. सध्या या अॅपमध्ये जवळपास २० टीम्स एकाच वेळी जोडल्या जाऊ शकतात. जी गरज पडल्यास वाढवताही येते.

जिओच्या या नवीन कम्युनिकेशन सिस्टीममध्ये एनडीआरएफ किंवा दूरवर बसलेले मदत अधिकारी 5जी कनेक्टेड ड्रोनद्वारे दुर्गम ठिकाणी झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊ शकतील. याशिवाय, मदत कर्मचारी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी व्हॉइस अॅक्टिव्हेटेड 5G कनेक्टेड उपकरणांचा वापर करतील. हेल्मेटवर बसवलेल्या या 5G उपकरणांमध्ये कॅमेरा, फ्लॅश लाइट आणि लेझर बीम सारखी फिचर आहेत.

Web Title: Awesome! Jio launches new system; High speed internet will be available even during floods, earthquakes and storms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.