शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

असुसचा सुपरस्लीम लॅपटॉप

By शेखर पाटील | Published: March 20, 2018 4:18 PM

असुस कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी झेनबुक फ्लिप एस हे जगातील सर्वात स्लीम व वजनाने हलके असणारे कन्व्हर्टीबल अर्थात टु-इन-वन मॉडेल सादर केले आहे.

असुस कंपनीने गेल्या मे महिन्यात काँप्युटेक्स-२०१७ या प्रदर्शनीत झेनबुक फ्लिप एस (युएक्स ३७००) हे मॉडेल पहिल्यांदा प्रदर्शीत केले होते. आता हे मॉडेल भारतीय बाजारपेठत उतारण्यात आले आहे. हे टु-इन-वन या प्रकारातील असल्यामुळे ते लॅपटॉपसोबत नोटबुक म्हणूनही वापरता येणार आहे. झेनबुक फ्लिप एसची जाडी फक्त ११.१ मिलीमिटर इतकी तर वजन फक्त १.१ किलोग्रॅम इतके आहे. यामुळे  हा जगातील सर्वात स्लीम आणि हलका लॅपटॉप बनला आहे. क्विक चार्ज तंत्रज्ञानाने युक्त असणारी यातील बॅटरी अतिशय उत्तम दर्जाची असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल ११ तासांपर्यंत चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर ४९ मिनिटांमध्ये ही बॅटरी ६० टक्क्यांपर्यंत चार्ज होते हे विशेष. यात दोन युएसबी ३.१ पोर्ट असतील. यासोबत ब्लॅकलिट प्रकारचा कि-बोर्ड, ग्लास टचपॅड, फिंगरप्रिंट सेन्सर, वेबकॅम, कोर्टना या डिजीटल असिस्टंटशी संलग्न करण्याजोगा मायक्रोफोन, हर्मन कार्दोन या कंपनीची दोन स्पीकरयुक्त ध्वनी प्रणाली आदी फिचर्स आहेत. याशिवाय कनेक्टिव्हिटीसाठी यात वाय-फाय आणि ब्ल्यु-टुथची सुविधा असेल. 

झेनबुक फ्लिप एस या मॉडेलमध्ये कॉर्निंग गोरीला ग्लासच्या संरक्षक आवरणासह १३.३ इंच आकारमानाचा फुल एचडी क्षमतेचा (१९२० बाय १०८० पिक्सल्स) नॅनोएज या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आला आहेत. हा डिस्प्ले तब्बल १७८ अंशात वाकवून याचा उपयोग करता येणार आहे. यात इंटेलचा आठव्या पिढीतील अतिशय गतीमान असा कोअर  आय ७ प्रोसेसर देण्यात आला आहे. याला इंटेल युएचडी ग्राफी ६५० या ग्राफीक कार्डची जोड देण्यात आली आहे. याची रॅम १६ जीबी तर स्टोअरेज ५१२ जीबी इतके असेल. हे मॉडेल विंडोज १० या प्रणालीवर चालणारे आहे. याचे मूल्य १,३०,९९० रूपये असून हे मॉडेल ग्राहकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानlaptopलॅपटॉप