शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

Asus चे चार नवीन बजेट लॅपटॉप भारतात लाँच; किंमत 17,999 रुपयांपासून सुरु  

By सिद्धेश जाधव | Updated: July 16, 2021 11:42 IST

ASUS launches new Chromebooks in India: आसूसने भारतात Asus Chromebook Flip C214, Chromebook C423, Chromebook C523 आणि Chromebook C223 असे चार लॅपटॉप सादर केले आहेत.  

आसुसने भारतात आपले चार नवीन लॅपटॉप लाँच केले आहेत. हे लॅपटॉप Asus Chromebook Flip C214, Chromebook C423, Chromebook C523 आणि Chromebook C223 नावाने बाजारात दाखल झाले आहेत. Chrome OS सह येणारे हे चारही लॅपटॉप फ्लिपकार्टवरून विकत घेता येतील. चला जाणून घेऊया या लॅपटॉपचे स्पेक्स आणि किंमत.  (ASUS Unveils New Chromebooks In India)

Asus Chromebook सीरिज लॅपटॉप्सची किंमत  

भारतात Asus Chromebook Flip C214 लॅपटॉप 23,999 रुपयांमध्ये लाँच केला गेला आहे. Asus Chromebook C423 ची किंमत 19,999 रुपये आहे आणि तसेच या लॅपटॉपचा टच व्हेरिएंट 23,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Asus Chromebook C523 ची किंमत 20,999 रुपये आणि या लॅपटॉपच्या टच मॉडेलची किंमत 24,999 रुपये आहे. Asus Chromebook C223 लॅपटॉप 17,999 रुपये किंमतीसह सीरिजमधील सर्वात स्वस्त लॅपटॉप आहे. हे आसूस क्रोमबुक 22 जुलैपासून फ्लिपकार्टवरून विकत घेता येतील.  

Asus Chromebook Flip C214 चे स्पेसिफिकेशन 

Asus Chromebook Flip C214 मध्ये 11.6-इंचाचा एचडी अँटी ग्लेयर डिस्प्ले देण्यात आला आहे. यात इंटेल ड्युअल कोर Celeron N4020 प्रोसेसर आणि इंटेल UHD ग्राफिक्स 600 देण्यात आला आहे. या लॅपटॉपमध्ये 4GB LPDDR4 रॅम आणि 64GB eMMC स्टोरेज मिळते. ही स्टोरेज मेमोरी कार्डच्या मदतीने 2TB पर्यंत वाढवता येते. कनेक्टिविटीसाठी या क्रोमबुकमध्ये एक USB 3.2 Gen 1 टाईप-ए, दोन USB 3.2 Gen 2 टाईप-सी, 3.5mm जॅक आणि एक माइक्रोएसडी कार्ड रीडर देण्यात आला आहे. यातील 50Whr ची बॅटरी 11 तासांचा बॅकअप देऊ शकते.  

Asus Chromebook C423 चे स्पेसिफिकेशन 

Asus Chromebook C423 मध्ये 14-इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात इंटेल Celeron N3350 प्रोसेसर आणि इंटेल ग्राफिक्स 500 मिळतो. हा क्रोमबुक 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. ही स्टोरेज 256GB पर्यंत वाढवता येते. या आसूस लॅपटॉपमध्ये दोन USB 3.2 Gen 1 टाईप-ए, दोन USB 3.2 Gen 1 टाईप-सी, 3.5mm ऑडियो जॅक आणि माइक्रोएसडी कार्ड रीडर, असे कनेक्टिव्हिटी ऑप्शन मिळतात. यात 38Whr ची बॅटरी देण्यात आली आहे.  

Asus Chromebook C523 चे स्पेसिफिकेशन 

Chromebook C523 मध्ये 15.6-इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा इंटेल Celeron N3350 ड्युअल कोर प्रोसेसर आणि इंटेल एचडी ग्राफिक्स 500 वर चालतो. सोबत 4GB रॅम आणि 64GB ची स्टोरेज मिळते. ही स्टोरेज 2TB पर्यंत वाढवता येईल. कनेक्टिव्हिटीसाठी या लॅपटॉपमध्ये दोन USB 3.2 Gen 1 टाईप-ए, दोन USB 3.2 Gen 1 टाईप-सी, 3.5mm ऑडियो जॅक आणि माइक्रोएसडी कार्ड रीडर असे ऑप्शन देण्यात आले आहेत. यात 38Whr ची बॅटरी देण्यात आली आहे.  

Asus Chromebook C223 चे स्पेसिफिकेशन 

Asus Chromebook C223 मध्ये 11.6-इंचाचा एचडी डिस्प्ले मिळतो. यात इंटेल Celeron N3350 ड्युअल कोर प्रोसेसर आणि इंटेल एचडी ग्राफिक्स 500 देण्यात आला आहे. हा लॅपटॉप 4GB रॅम आणि 32GB स्टोरेजसह बाजारात आला आहे. ही स्टोरेज 2TB पर्यंत वाढवता येते. यात दोन USB 3.2 Gen 1 टाईप-ए, दोन USB 3.2 Gen 1 टाईप-सी, 3.5mm ऑडियो जॅक आणि माइक्रोएसडी कार्ड रीडर असे कनेक्टिव्हिटी ऑप्शन देण्यात आले आहेत. यात 38Whr ची बॅटरी आहे.  

टॅग्स :Asus Phoneअसूस मोबाइलlaptopलॅपटॉपtechnologyतंत्रज्ञान