शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
3
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
4
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
5
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
6
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
7
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
8
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
9
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
10
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
11
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
12
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
13
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
14
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
15
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
16
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
17
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
18
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
19
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
20
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे ट्रेनिंग घेऊ शकता मोफत, अशा प्रकारे करा रजिस्ट्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 14:06 IST

artificial intelligence training program 2023 : या कार्यक्रमाला एआय फॉर इंडिया २.०  (AI for India 2.0) असे नाव देण्यात आले आहे.

नवी दिल्ली : देशातील तरुणांचे कौशल्य वाढवण्याच्या उद्देशाने भारत सरकारने मोफत आर्टिफिशियल इंटेलिजन्स(एआय) आधारित प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाला एआय फॉर इंडिया २.०  (AI for India 2.0) असे नाव देण्यात आले आहे. गेल्या शनिवारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली. हे प्रशिक्षण ऑनलाइन मिळणार आहे. हे प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांना एआयची प्राथमिक माहिती मिळू शकेल. तसेच, या तरुणांना आपल्या करिअरमध्येही या प्रशिक्षणाचा फायदा होईल.

जागतिक युवा कौशल्य दिन म्हणजेच १५ जुलैला या कार्यक्रमाची सुरुवात रोजी झाली. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या देखरेखीखाली सुरू झालेला हा प्रोग्राम स्किल इंडिया, आयआयटी मद्रास, आयआयएम अहमदाबादची कंपनी जीयूव्हीआय यांचा संयुक्त उपक्रम आहे. देशाच्या भौगोलिक परिस्थितीमुळे आणि बहुभाषिक असल्याने, सध्या ते इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, उडिया, मराठी आणि गुजराती या नऊ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.

देशाच्या प्रत्येक भागात पोहोचण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. एआयची माहिती अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहोचवावी लागणार आहे. प्रादेशिक भारतीय भाषांच्या माध्यमातून हे काम अगदी सहज करता येईल, असा केंद्र सरकारचा विश्वास आहे. तसेच, तरुणांना सक्षम बनवता येईल. कार्यक्रम यशस्वी झाल्यास, तो इतर भाषांमध्येही उपलब्ध करून दिला जाईल.

कशी करावी नोंदणी?- या कार्यक्रमासाठी नोंदणी सुरू झाली आहे. https://www.guvi.in/ai-for-india/#tatsu-section-V6VE9tukoeI या लिंकला भेट देऊन कोणताही तरुण स्वतःची नोंदणी करू शकतो. - मागितलेली माहिती भरून नोंदणी पूर्ण करा. १५ ऑगस्ट २०२३ रोजी व्हर्च्युअल कार्यक्रमात सामील व्हा आणि दिलेल्या वेळेनुसार प्रकल्प सबमिट करा. - १४ ऑगस्ट २०२३ पर्यंत नोंदणी करता येईल. त्यानंतर नोंदणी बंद होईल. शिकण्यासाठी तुम्ही ऑनलाइन उपलब्ध असणे आवश्यक आहे. - सर्व कंटेन्ट ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्र सरकारही यशस्वी तरुणांना इंटर्नशिपची संधी देणार आहे. - अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सरकारकडून एक प्रमाणपत्रही दिले जाईल, जे तरूण आपल्या करिअरच्या काळात कधीही, कुठेही वापरू शकतात. 

टॅग्स :Educationशिक्षणtechnologyतंत्रज्ञान