शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

क्या से क्या हो गया...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 07:53 IST

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वेग एवढा की जी कामं आपण आज करतो, त्यासाठी उद्या माणसांची गरजच उरणार नाही. मग काय कराल?

खरं तर इंडस्ट्री ४.० चे रोजगारावर होणारे परिणाम या विषयावर पुढील काही भागात लिहायचं मनात होतं; परंतु मागील आठवड्यात नोबेल पारितोषिक विजेता पॉल क्रुमान याने भारतीयांना जाणीव करून दिली की मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जर आपण पुरेसा विकास आणि तद्नुषंगिक रोजगारनिर्मिती करू शकलो नाही, तर एआय अर्थात आर्टिफिशियल इंटिलिजन्समुळे आपल्यावर मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीची कुºहाड कोसळेल! लगेच ४-५ दिवसात रघुराम राजन यांनीसुद्धा एआयमुळे होणारे रोजगारांवरचे परिणाम यावर भाष्य केलं. त्यांनी असं विशेषत्वानं म्हटलं की जे रोजगार व काम हे एम्पथी (समवेदना/अनुकंपा) वर अथवा नवोन्मेष/ प्रतिभा (क्रिएटिव्हिटी) यावर अवलंबून असतील. ते एआयपासून ‘सुरक्षित’ राहातील!आपण या लेखमालेच्या शेवटाकडे येऊ तेव्हा मी तुम्हाला या इंडस्ट्री ४.० मध्ये आपण विकून राहण्यासाठी काय करता येईल, याची काही सूत्रे सांगणार आहे; परंतु बऱ्याच ई-मेल्स आणि वाचकांच्या काही फोन्समुळेही मला असं वाटलं की अगदी शेवटपर्यंत न थांबता, आताच एक छान स्टेप्स तुम्हाला सांगतो, अगदी लगेच करण्यासारखी.

www.edx.org या प्रख्यात वेबसाइटवर जाऊन तुम्ही ‘इंडस्ट्री ४.० : हाऊ टू रिव्होल्युशलाइज युवर ब्रेन’ नावाचा एस कोर्सकरा. तो विनामूल्य आहे. (एवढ्यातच करा.) द हॉँगकॉँग पोलिटेक्निक युनिव्हर्सिटीतर्फे असणारा हा कोर्स ८ आठवड्यांचा आहे. इंग्रजीमध्ये आहे. तुम्हा- आम्हाला समजण्यासारखा आहे. दर आठवड्याला ६-८ तासांची तयारी ठेवली की हा कोर्स सहजसाध्य आहे.पूर्वी मी अनेक विद्यार्थी व शिक्षकांनाही काही कोर्सेस सुचवले होते. ते तेव्हा विनामूल्य उपलब्ध होते. आता त्यासाठी चार-पाच हजार रुपये मोजावे लागतात. किमतीला उपलब्ध आहेत. माझा तुम्हाला मैत्रीपूर्ण सल्ला (धमकी समजलीत तरी चालेल!) आहे की वरील सांगितलेला उत्तम कोर्स वेळात वेळ काढून कराच!असो, बाकी काही स्टेप्स पुढे बघूच ..बिग डाटा, एआव्हीआरबद्दल आपण मागील दोन लेखात बघितले. तोच धागा पकडून पुढे जायचंय. तुम्ही बहुदा गुगल ग्लॅब नावाची संकल्पना ऐकली असेल. ज्याच्यात तुमच्या चष्म्यामध्ये तुम्ही टीव्ही दिसेल, व्हिडीओ दिसले, इंटरनेटवरील माहिती दिसेल. या गुगल ग्लॅबचा वापर मलेशियामध्ये सामाजिक तयारीत व तेथील अ‍ॅण्टी पोचिंग पथकं करतात. गुगलचा अजून एक प्रकल्प म्हणजे प्रोजेक्ट सॉइल. यात गुगल अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड प्रोजेक्ट हा प्रभाग काम करतोय. यामध्ये रडारवर आधारित इंटरॅक्टिव्ह प्रोग्रॅम आहेत. आणि त्यात गेस्चर रेकगनायझेशन आहे. म्हणजे हात/ बोटं यांच्या नुसत्या हालचालींवरून कॉम्प्युटरवरील गोष्टी करता येतील. गुगल ग्लॅब आणि प्रोजेक्ट सॉइल हे एआर, व्हीआरचे आविष्कार आहेत.डीलॉइट या प्रख्यात कंपनीने असं म्हटल की २०१८ मध्ये जगाची १/७ लोकसंख्या (१ बिलियन लोकं) ही मोबाइलच्या आधारे एआर स्वत:ची स्वत: तयार करू लागेल! म्हणजे लक्षात घ्या तुम्ही/आम्ही! आज हेच बघा ना, सेल्फी कशी घ्यायची ते माहिती नसणाऱ्याला आपण ‘निरीक्षर’ समजतो, या वर्षाअखेर आपल्यापैकी अनेकांनी स्वत:च्या मोबाइलमध्ये एआर क्लिप बनवली असेल!!एआर/व्हीआरच्या पुढे आजकाल लोक बोलताहेत ते एमआर ( मिक्सड रिअ‍ॅलिटी) आणि हायब्रिड रिअ‍ॅलिटी.पूर्वी एअरलाइनच्या पाइलट्सना स्वत: खूपच काम करायला लागायचं. आजची एआर/व्हीआरची स्थिती अशी आहे की बोर्इंग ७७७ चा पाइलट हा स्वत:चं कसब फक्त ७ मिनिटे वापरतो, ४-५ तासांच्या फ्लाइटमध्ये! तेही कुठे तर उड्डाण आणि लॅण्डिंग म्हणजे विमान उतरवताना! एअरबसचा पाइलट तर फक्त ३-४ मिनिटे मॅन्युअल काम करतो बाकी सर्व फ्लाइट ही स्वयंनियंत्रित!आयबीएम इंडिंयाने ‘अशर’ नावाची एक यंत्रणा बनवली. तसेच आयबीएम ब्राझीलनेसुद्धा एक यंत्रणा बनवली. म्युझियममधे असणारे प्रदर्शनातील पुतळे/ चित्रे/ वस्तू याची माहिती सांगणारी यंत्रणा. हे एक मोबाइल अ‍ॅप आहे. ते वापरून तुम्ही ज्या पुतळ्यापाशी जाल त्याविषयी हा एआरचा गाइड आपोआप तुम्हाला मातृभाषेत माहिती सांगू लागतो.मनात विचार आला. या एआयच्या गाइडमुळे ‘क्या से क्या हो गया’ झालं नाही म्हणजे मिळवलं.- डॉ. भूषण केळकर( लेखक आयटी तज्ज्ञ आहेत.)

bhooshankelkar@hotmail.com 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान