शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅक्वा जाझ : जाणून घ्या सर्व फिचर्स

By शेखर पाटील | Updated: December 13, 2017 22:33 IST

अ‍ॅक्वा मोबाईल्स या कंपनीने आपल्या जाझ या ड्युअल कॅमेरायुक्त स्मार्टफोनला भारतीय बाजारपेठेत ५,९९९ रुपये मूल्यात उतरण्याची घोषणा केली आहे.

अ‍ॅक्वा मोबाईल्स या कंपनीने आपल्या जाझ या ड्युअल कॅमेरायुक्त स्मार्टफोनला भारतीय बाजारपेठेत ५,९९९ रुपये मूल्यात उतरण्याची घोषणा केली आहे. अ‍ॅक्वा मोबाईल्स या कंपनीने जाझ मॉडेलच्या माध्यमातून भारतीय बाजारपेठेतील किफायतशीर मूल्याच्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे.अर्थात अत्यंत किफायतशीर मूल्यात या कंपनीने ड्युअल कॅमेरा सेटअप असणारे मॉडेल लाँच करून लक्ष वेधून घेतले आहे. याच्या मागील बाजूस १३ आणि ०.३ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील एक आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असेल. या दोन्हींच्या एकत्रित परिणामातून अतिशय दर्जेदार आणि जीवंत वाटणारे फोटोग्राफ घेता येणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी अ‍ॅक्वा जाझ या मॉडेलमध्ये ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आलेला आहे.अ‍ॅक्वा जाझ स्मार्टफोनमध्ये ५ इंच आकारमानाचा आणि १२८० बाय ७२० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा आयपीएस या प्रकारातील डिस्प्ले दिलेला आहे. तर यातील प्रोसेसर क्वॉड-कोअर या प्रकारातील असेल. या स्मार्टफोनची रॅम १ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. यात २८०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे. तर हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे असेल.यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-यूएसबी आदी फिचर्स असतील. तर यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हिटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत. अ‍ॅक्वा जाझ हा स्मार्टफोन ग्राहकांना ब्लॅक आणि गोल्ड या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल