Apple चा मोठा निर्णय! आता iPhone चे 4 नाही, तर 6 मॉडेल लॉन्च होणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 18:30 IST2025-05-05T18:28:18+5:302025-05-05T18:30:08+5:30

iPhone 18 एअर आणि iPhone 18 फोल्ड लॉन्च केला जाऊ शकतो.

Apple's big decision! Now not 4, but 6 models of iPhone will be launched... | Apple चा मोठा निर्णय! आता iPhone चे 4 नाही, तर 6 मॉडेल लॉन्च होणार...

Apple चा मोठा निर्णय! आता iPhone चे 4 नाही, तर 6 मॉडेल लॉन्च होणार...

अमेरिकन टेक कंपनी Apple 2007 पासून दरवर्षी आपल्या iPhone चे नवे मॉडेल लॉन्च करत आहे. नवीन मॉडेल्समध्ये काहीतरी अपग्रेड्स पाहायला मिळतात. पण, पुढील वर्षांपासून Apple 4 नाहीी, तर iPhone चे 6 मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. गेल्यावर्षी कंपनीने आपल्या iPhone 16 सीरीजच्या स्टँडर्ड डिझाईनमध्ये बदल केला होता. तसेच, ही सीरीज Apple Intelligence फीचर्ससह आली होती. यंदा अॅपल सर्वात पातळ आयफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. हे मॉडेल iPhone 16 Plus ला रिप्लेस करेल. 

4 ऐवजी 6 आयफोन लॉन्च होणार!
अलिकडेच एक नवीन अहवाल समोर आला आहे, त्यानुसार, अॅपल पुढील 2022-27 मध्ये 4 ऐवजी 6 आयफोन मॉडेल लॉन्च करू शकते. यामध्ये, दोन नवीन मॉडेल्स आयफोन 18 एअर आणि आयफोन 18 फोल्ड जोडले जाऊ शकतात. एवढेच नाही तर कंपनी 2027 मध्ये आपला स्डॅंडर्ड आयफोन 18 देखील लॉन्च करू शकते. 2027 च्या सुरुवातीला आयफोन 18e सोबत तो लॉन्च केला जाईल.

पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात कंपनी आयफोन 18 एअर, आयफोन 18 फोल्ड, आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्स लॉन्च करणार आहे. तर, 2027 च्या सुरुवातीला आयफोन 18 आणि आयफोन 18ई लॉन्च केला जाईल. अॅपलने गेल्या वर्षी 4 आयफोन मॉडेल लॉन्च केले होते. तर, या वर्षी कंपनीने आणखी एक नवीन मॉडेल आयफोन 16ई लॉन्च केला आहे. हे नवीन मॉडेल आयफोन एसई सीरिजची जागा घेईल. या वर्षी कंपनी आयफोन 17 एअर लॉन्च करण्याची तयारी करत आहे, जो पूर्णपणे पोर्टलेस आयफोन असेल. त्यामध्ये सिम कार्ड किंवा चार्जिंगसाठी कोणतेही पोर्ट दिले जाणार नाही.

iPhone 18 Fold संभाव्य फिचर्स
आयफोन 18 सिरीजमध्ये आणखी एक नवीन मॉडेल आयफोन 18 फोल्ड जोडला जाऊ शकतो, जो कंपनीचा पहिला फोल्डेबल फोन असेल. या मॉडेलबद्दल अनेक लीक्स देखील समोर आले आहेत. आयफोन 18 फोल्डमध्ये 8 इंचाचा फोल्डेबल डिस्प्ले असेल. यासह, 5.7 इंचाचा दुसरा म्हणजेच कव्हर डिस्प्ले दिला जाऊ शकतो. या फोल्डेबल आयफोनमध्ये फेस आयडी बायोमेट्रिक फीचर असेल. तसेच, कंपनी हा फोल्डेबल आयफोन अंडर-डिस्प्ले सेल्फी कॅमेरासह लॉन्च करू शकते. याशिवाय, ही सीरिज A20 प्रो बायोनिक प्रोसेसरसह येईल.

Web Title: Apple's big decision! Now not 4, but 6 models of iPhone will be launched...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.