Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 23:25 IST2025-06-09T23:24:19+5:302025-06-09T23:25:48+5:30

Apple WWDC 2025 Marathi Live: अ‍ॅपलने लिक्विड ग्लास डिझाईनची घोषणा केली आहे. तसेच अ‍ॅपल वॉलेटसह नवीन युआय आणणार असल्याचेही संकेत कंपनीने दिले आहेत. 

Apple WWDC 2025 Marathi Coverage ios 26 Launch: Apple Jumps from iOS 18 to 26; All iPhones get Liquid Glass design, Live Translation and more... | Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...

Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...

जगातील सर्वात मोठी प्रिमिअम स्मार्टफोन कंपनी अ‍ॅपलने दरवर्षीप्रमाणे यंदाचा Apple WWDC 2025 ला सुरुवात केली आहे. यावेळी अ‍ॅपलने लिक्विड ग्लास डिझाईनची घोषणा केली आहे. तसेच अ‍ॅपल वॉलेटसह नवीन युआय आणणार असल्याचेही संकेत कंपनीने दिले आहेत. 

दर्जेदार कंटेंट प्रदान करण्याच्या बाबतीत AppleTV अव्वल स्थानावर असल्याचा दावा टिम कुक यांनी केला. Apple Intelligence वर समर्थित भाषांची संख्या वाढवण्यात आल्याचेही ते म्हणाले. याचबरोबर अ‍ॅपलने ओएसचे व्हर्जन बदलले आहे. iOS, WatchOS सह इतर ऑपरेटिंग सिस्टमची नावे बदलून iOS26, WatchOS 26, tvOS26, MacOS26, VisionOS26, iPadOS 26 अशी केली आहेत. आयओएस 18 नंतर ही थेट २६ वर उडी मारलेली आहे. 

काय काय असणार नवे...
सफारी ब्राउझरमध्ये एक नवीन टॅब बार सादर करण्यात आला आहे. स्क्रीनवर संपूर्ण वेब पेज दिसेल, सर्च बार देखील येईल आणि फेसटाइमचा लूक देखील बदलण्यात आला आहे. 

कॅमेरा अ‍ॅपमध्ये मोठे बदल दिसतील. एका क्लिकवर त्यांच्यासमोर व्हिडीओ, फोटोचे पर्याय येणार आहेत. 

अ‍ॅपल इंटेलिजेंसमध्ये लाईव्ह ट्रान्सलेशन फीचर एकत्रित केले जात आहे. ते टेक्स्ट आणि ऑडिओ ट्रान्सलेशनला सपोर्ट करेल. व्हिडीओ कॉलमध्ये देखील वापरता येणार आहे. कॉल दरम्यान लाईव्ह ट्रान्सलेशनचा ऑडिओ देखील ऐकू येईल. आयमेसेज अ‍ॅपमध्ये चॅट दरम्यान मेसेजेसचे भाषांतर करण्यास सक्षम असणार आहे. 

फोन अ‍ॅप देखील अपडेट करण्यात आले असून AI तुमच्यासाठी कॉल तुमच्या ओळखीच्या व्यक्तीचा आहे की दुसऱ्याचा हे सांगणार आहे. व्हॉइस मेलसाठी AI समरी हे वैशिष्ट्य देण्यात आले आहे. म्युझिक अ‍ॅपमध्ये लिरिक्स ट्रान्सलेशन फीचर उपलब्ध केले जाणार आहे. 

अ‍ॅपलने गेम्स अ‍ॅप देखील सादर केले आहे. तुम्ही जे गेम सारखे खेळता ते दिसणार आहेत. तसेच प्ले टुगेदरचा पर्याय देखील असणार आहे.
 
गुगलच्या सर्कल टू सर्चसारखे फिचर अ‍ॅपल देऊ लागणार आहे. व्हिज्युअल इंटेलिजेंस आता कोणत्याही अ‍ॅपवर वापरता येणार आहे. फक्त फरक एवढाच आहे की तुम्हाला आधी स्क्रीनशॉट घ्यावा लागणार आहे. 

Web Title: Apple WWDC 2025 Marathi Coverage ios 26 Launch: Apple Jumps from iOS 18 to 26; All iPhones get Liquid Glass design, Live Translation and more...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Apple Incअॅपल