शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

Apple नं लाँच केली पाण्याची बाटली, किंमत इतकी की मिळेल स्वस्त फ्रिज; पाहा काय आहे खास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 7:27 PM

Apple Water Bottle : अॅपलनं नुकतीच एक पाण्याची बाटली लाँच केली आहे. अन्य प्रोडक्टप्रमाणे ही बॉटलदेखील प्रीमिअम प्राईज टॅगसोबत उपलब्ध आहे.

Apple Water Bottle : दिग्गज टेक कंपनी अॅपल आपल्या प्रीमिअम प्रोडक्ट्ससाठी ओळखली जाते. त्यांची किंमत अन्य कंपन्यांच्या तुलनेत खुप अधिक असते. नुकताच कंपनीनं एक पॉलिशिंग क्लोथ लाँच केला होता. त्याची किंमत १९०० रुपये इतकी आहे. आता कंपनीनं एक वॉटर बॉटल लाँच केली आहे. त्याची किंमत तुमच्या चेहऱ्याचा रंग उडवू शकते. सध्या ही कंपनी अमेरिकेत लाँच करण्यात आली असून त्याचं नाव Hidrate Spark असं आहे.

कंपनीनं आपल्या अधिकृत वेबसाईटवर ही वॉटर बॉटल लिस्ट केली आहे. याची किंमत पाहून तुमच्या चेहऱ्याचा रंग नक्कीच उडेल. याची किंमत ५९.९५ डॉलर्स म्हणजेच जवळपास ४६०० रुपये इतकी आहे. सध्या ही केवळ अमेरिकन बाजारपेठेत उपलब्ध आहे. यात काय विशेष आहे याबद्दल तुम्ही विचार करत असाल. ही बॉटल अॅपलच्या अन्य प्रोडक्टप्रमाणेच खास आहे.

ही एक स्मार्ट वॉटर बॉटल आहे आणि ती तुमच्या डेली वॉटर अथवा फ्युएड इनटेकला मॉनिटर करते. ही बॉटलदेखील दोन व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध आहे. ही Hidrate Spark आणि Hidrate Spark Pro या व्हेरिअंटमध्ये मिळते. याची किंमत अनुक्रमे ५९.९५ डॉलर्स आणि ७९.९५ डॉलर्स म्हणजेच जवळपास ६१०० रुपये आहे. भारतात या किंमतीत तुम्हाला एक छोटो फ्रिजही मिळू शकतो.

काय आहेत फीचर्स?Hidrate Spark ही एक स्टील बॉटल आहे. तसंच ती सिल्व्हर आणि ब्लॅक या दोन कलर व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. यात एक एलईडी सेन्सर असून तो वॉटर इनटेक सेन्स करतो. तसंच अॅपल हेल्थ अॅपला तो ब्लूटूथ द्वारे अलर्टही करतो. Hidrate Spark Pro ही ब्लॅक आणि ग्रीन कलर व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. ही एक व्हॅक्युम आयसोलेटेड बॉटल असल्यानं त्यात २४ तास पाणी थंड राहू शकतं. याचं वजन जवळपास ९१० ग्राम आहे. अन्य देशांमध्ये ही बॉटल केव्हा उपलब्ध होईल याबाबत मात्र माहिती देण्यात आलेली नाही.

टॅग्स :Apple Incअॅपलtechnologyतंत्रज्ञान