Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 01:05 IST2025-09-10T01:04:45+5:302025-09-10T01:05:28+5:30
Apple Awe Dropping Event : नव्या iPhone Air ची सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे, याचे डिझाइन. जी सर्वात मजबूत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
Apple Event 2025 : आयफोन निर्माता कंपनी अॅपल आपल्या प्रोडक्टमध्ये सातत्याने इनोव्हेशन करत असते आणि काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असते. या वर्षी कंपनीने आयफोन 17 मालिकेसह सर्वात स्लीम मॉडेलही लाँच केले असून त्याला आयफोन एअर, असे नाव देण्यात आले आहे. या डिव्हाइससह, कंपनीने प्लस मॉडेल बंद केले आहे आणि नवीन एअरने त्याची जागा घेतली आहे.
नव्या iPhone Air ची सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे, याचे डिझाइन. जी सर्वात मजबूत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. या मोबाइलला सिरॅमिक टायटॅनियम बॉडी देण्यात आली आहे. जीची जाडी केवळ 5.6mm एवढी आहे. महत्वाचे म्हणजे, युजर्सना एवढ्या स्लीम डिझाइनसोबत Pro डिव्हाइस प्रमाणे, परफॉर्मंन्स मिळेल, असा दावा कंपनीने केला आहे.
iPhone Air चे स्पेसिफिकेशंस -
डिव्हाइसला 6.5 इंचांच्या डिस्प्लेवर सिरॅमिक शील्डची सुरक्षितता देण्यात आली आहे. तसेच ही सेफ्टी बॅक पॅनलवरही मिळते. यात 120Hz ProMotion डिस्प्ले मिळतो. जो 3000nits चा पीक ब्राइटनेस ऑफर करतो. डिव्हाइसमध्ये A19 Pro प्रोसेसर देण्यात आले आहे. हा कुठल्याही स्मार्टफोनमध्ये मिळणारा सर्वात फास्ट चिप सेट आहे. यामुळे, चांगली बॅटरी परफॉर्मन्स मिळतो. याच बरोबर, GPU देखील AI कंप्यूटसाठी चांगल्या पद्धतीने ट्यून करण्यात आले आहे. यात eSIM वापरण्याचा पर्यायही मिळतो.
हेही वाचा - iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
यात N1 चिप देण्यात आली आहे. याने लेटेस्ट WiFi 7 आणि Bluetooth 6 शिवाय, Thread सह लेटेस्ट वायरलेस कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. याशिवाय, C1x मॉडेम चिप, बॅकपॅनलवर 48MP फ्यूजन कॅमरा सेटअप, 2x टेलीफोटो झूम, सामोर 24MP सेंटर स्टेज सेल्फी कॅमेरा, तसेच डुअल कॅप्चर व्हिडिओ फीचरही देण्यात आले आहे.
याशिवाय, बॅटरीसंदर्भात बोलायचे झाल्यास, कंपनीच्या मते, अॅडॉप्टिव्ह पॉवर मोड सारख्या बॅटरी सेव्हिंग फीचर्ससह, यात दिवसभाराची बॅटरी लाईफ मिळेल.
किती असेल iPhone Air ची किंमत -
iPhone Air स्पेस ब्लॅक, क्लाउड व्हाइट, स्काय ब्लू सारख्या कलर ऑप्शंसमध्ये येईल. याची भारतीय बाजारातील बेस मॉडेल (256GB) प्राइस 119,900 रुपयांपासून सुरू होईल.