अॅपलचे लॅपटॉपही भाड्याने मिळायला लागले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 10:56 AM2018-10-10T10:56:30+5:302018-10-10T10:56:34+5:30

भाडेकरारावर केवळ घरे, घरातील साहित्य मिळण्याचे दिवस आता मागे पडू लागले आहेत.

Apple laptops available on rental too... | अॅपलचे लॅपटॉपही भाड्याने मिळायला लागले...

अॅपलचे लॅपटॉपही भाड्याने मिळायला लागले...

Next

भाडेकरारावर केवळ घरे, घरातील साहित्य मिळण्याचे दिवस आता मागे पडू लागले आहेत. नुकतेच महागडे फोनही रेंटवर उपलब्ध झाल्यानंतर आता अॅपलचालॅपटॉप MacBook Air केवळ 3473 रुपयांच्या प्रति महिना भाड्याने उपलब्ध झाला आहे. रेंट मोजो या वेबसाईटवर ही सुविधा उपलब्ध झाली आहे. 
कंपनीने सध्या अॅपल आणि डेल या दोन कंपन्यांचे लॅपटॉप उपलब्ध केले आहेत. सुरुवातीला ग्राहकांना काही अनामत रक्कम द्यावी लागणार आहे. ही रक्कम रिफंडेबल आहे. याशिवाय 12 महिन्यांनतर ग्राहक त्यांना मिळालेला लॅपटॉप खरेदीही करू शकतात. 

लॅपटॉप             अनामत     6 महिने    12 महिने    18 महिने
MacBook Pro    12,924    10,756      6,462         5,639
MacBook Air    7,958      6,624        3,979         3,473
Dell XPS           16,962    15,939       8,481         7,323
Dell Latitude   8,482      7,970        4,241          3,662

Rentomojo ची सेवा सध्या केवळ 8 शहरांमध्येच मिळत आहेत. यामध्ये दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरु, नोएडा, गुडगाव, चेन्नई आणि हैदराबाद या शहरांता समावेश आहे. 

Web Title: Apple laptops available on rental too...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.