फाडू ऑफर! फक्त 15,499 रुपयांमध्ये लोकप्रिय iPhone, जुना स्टॉक संपवण्यासाठी Apple ची खटपट? 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 05:45 PM2022-03-02T17:45:33+5:302022-03-02T17:45:58+5:30

फ्लिपकार्टवर Apple iPhone SE फक्त 15,499 मध्ये विकत घेता येत आहे.

Apple iPhone SE Price Drops To 15499 As iPhone SE 3 Launch Arrives Know Would You Buy It Or Not  | फाडू ऑफर! फक्त 15,499 रुपयांमध्ये लोकप्रिय iPhone, जुना स्टॉक संपवण्यासाठी Apple ची खटपट? 

फाडू ऑफर! फक्त 15,499 रुपयांमध्ये लोकप्रिय iPhone, जुना स्टॉक संपवण्यासाठी Apple ची खटपट? 

Next

Apple येत्या 8 मार्चला आपला नवीन स्वस्त iPhone मॉडेल सादर करणार आहे. हा फोन iPhone SE 3 नावानं बाजारात येईल. त्यामुळे Apple iPhone SE ची किंमत खूप कमी झाली आहे. इतकी की फ्लिपकार्टवर Apple iPhone SE फक्त 15,499 मध्ये विकत घेता येत आहे. चला जाणून घेऊया कोणत्या ऑफरमुळे सर्वांच्या बजेटमध्ये अ‍ॅप्पल आयफोन घेता येत आहे.  

Apple iPhone SE वरील ऑफर 

Apple iPhone SE ची मूळ किंमत 39,900 रुपये आहे. परंतु फ्लिपकार्टवर हा फोन 24 टक्के डिस्काउंटनंतर थेट 30,299 रुपयांमध्ये विकला जात आहे. तसेच तुम्ही तुमचा जुना फोन देऊन अजून बचत करू शकता. यासाठी फ्लिपकार्टनं एक्सचेंज ऑफरची घोषणा केली आहे. तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून 14,800 रुपयांपर्यंतची सवलत मिळवू शकता. त्यामुळे Apple iPhone SE ची किंमत फक्त 15,499 रुपये होईल.  

iPhone SE 2020 चे स्पेसीफिकेशन्स  

iPhone SE 2020 मध्ये 4.7-इंचाचा रेटिना एचडी आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 625 नीट्स ब्राईटनेस, HDR10, डॉल्बी व्हिजन आणि ट्रू टोनला सपोर्ट करतो. या फोनमध्ये Touch ID साठी बटन देण्यात आले आहे. फोनच्या बॅक पॅनलवर 12MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 5MP च्या फ्रंट कॅमेऱ्यासह सादर करण्यात आला आहे. या एंट्री लेव्हल आयफोनमध्ये वायरलेस चार्जिंग आणि IP67 डस्ट आणि वॉटर रेजिस्टन्स देण्यात आले आहे.   

iPhone SE 3 चे संभाव्य फिचर्स  

iPhone SE 3 मध्ये iPhone SE 2020 सारखीच 4.7 इंचाची स्क्रिन असणार आहे. नव्या फोनमध्ये अद्ययावत A15 Bionic चिपसेट देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे याच चिपसेटचा वापर iPhone 13 मध्येही करण्यात आला आहे. म्हणजेच iPhone SE 3 मध्ये 5G सपोर्ट मिळणार आहे. Apple कडून नवा आयफोन एसई-3 हा 4GB RAM आणि 256GB च्या स्टोरेजमध्ये उपलब्ध होऊ शकतो.  

याआधीच्या SE मॉडेल प्रमाणेच याफोनमध्ये 12MP चा सिंगल रिअर कॅमेरा आणि 8MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध करुन दिला जाऊ शकतो. बॅटरीबाबत बोलायचं झालं तर iPhone SE 2020 मध्ये 1821mAh क्षमतेची बॅटची देण्यात आली होती. पण iPhone SE 3 मध्ये त्यापेक्षा अधिक क्षमतेची बॅटरी उपलब्ध करुन दिली जाऊ शकते.  

हे देखील वाचा:

 

Web Title: Apple iPhone SE Price Drops To 15499 As iPhone SE 3 Launch Arrives Know Would You Buy It Or Not 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.