व्हिडीओ अ‍ॅप बंद करण्याचा Instagram चा निर्णय; क्रियेटर्सवर होऊ शकतो मोठा परिणाम 

By सिद्धेश जाधव | Published: March 2, 2022 04:49 PM2022-03-02T16:49:19+5:302022-03-02T16:50:27+5:30

Instagram आपलं स्टॅन्डअलोन व्हिडीओ अ‍ॅप बंद करणार आहे. कंपनी युजर्ससाठी अ‍ॅपमध्ये काही रोमांचक बदल करणार आहे.  

Instagrams big decision will shut down this app know what will change for the users  | व्हिडीओ अ‍ॅप बंद करण्याचा Instagram चा निर्णय; क्रियेटर्सवर होऊ शकतो मोठा परिणाम 

व्हिडीओ अ‍ॅप बंद करण्याचा Instagram चा निर्णय; क्रियेटर्सवर होऊ शकतो मोठा परिणाम 

Next

Instagram नं मोठा निर्णय घेतला आहे. मेटा अधिकृत ही कंपनी आपल्या एका स्टॅन्डअलोन अ‍ॅपचा सपोर्ट बंद करणार आहे. सध्या अ‍ॅप स्टोरमध्ये उपलब्ध असलेला IGTV चं अ‍ॅप्लिकेशन पुढील महिन्यात हटवण्यात येईल. त्याऐवजी कंपनी मेन इंस्टाग्राम अ‍ॅपवर सर्व व्हिडीओज ठेवण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. त्यामुळे लोकांना मेन अ‍ॅपवर सुविधा वापरणं सोपं जाईल.  

नवीन फीचर्सवर करणार काम 

तरुणाईचं मन जिंकण्यासाठी सतत नवनवीन प्रयोग करणं आवश्यक असतं. म्हणू कंपनी काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करते. लवकरच इंस्टाग्राममध्ये देखील फुल स्क्रीन व्यूअर आणि टॅप टू म्यूटचे पर्याय देण्यात येतील. तसेच व्हिडीओ शेयर करणं आणि क्रिएशन टूलला एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच टेस्टिंगमध्ये असलेलं अ‍ॅड एक्सपीरिएंस फिचर रील्स क्रियेटर्सना पैसे मिळवून देण्यास मदत करेल. 

IGTV ची जागा कोण घेणार  

इंस्टाग्रामवर मोठे व्हिडीओ अपलोड करता यावे यासाठी कंपनी आयजीटीव्हीच्या वेगळ्या अ‍ॅपची सुरुवात करण्यात आली होती. परंतु आता इंस्टाग्राम युजर्स होम पेजवर वरच्या बाजूला उजव्या कोपर्यत असलेल्या प्लस (+) वर टॅप करून 60 मिनिटांपर्यंतचा व्हिडीओ अपलोड करू शकतात.  

हे देखील वाचा:

Web Title: Instagrams big decision will shut down this app know what will change for the users 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.