शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

iPhone SE 3 ची किंमत लीक, स्वस्तात मस्त Apple चा 5G स्मार्टफोन येतोय; जाणून घ्या डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 12:38 IST

Apple iPhone SE 3 Leak: Apple कडून लवकरच iPhone SE3 स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मार्च २०२२ मध्ये Apple कंपनीकडून याचं लॉन्चिंग करण्याची दाट शक्यता आहे.

Apple iPhone SE 3 Leak: Apple कडून लवकरच iPhone SE3 स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मार्च २०२२ मध्ये Apple कंपनीकडून याचं लॉन्चिंग करण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भातील नवी माहिती देखील आता उघड झाली आहे. यात आयफोन एसई-३ ची किंमत आता समोर आली आहे. 

मार्केट अॅनालिस्ट John Donovan यानं येऊ घातलेल्या Apple iPhone SE 3 2022 ची किंमत शेअर केली आहे. हा स्मार्टफोन ३०० डॉलर (जवळपास २२ हजार रुपये) इतकी असण्याची शक्यता आहे. जर असं झालं तर नव्या iPhone SE 3 ची किंमत iPhone SE 2020 पेक्षाही कमी ठरेल. त्यामुळे iPhone SE 3 हा स्मार्टफोन आयफोनचा सर्वात स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन ठरणार आहे. 

नवं काय?कंपनीनं या स्मार्टफोनमध्ये अत्याधुनिक प्रोसेसर, 5G सपोर्ट आणि चांगल्या क्षमतेची बॅटरी दिल्याचं बोललं जात आहे. आयफोन एसई-३ ची किंमत जरी २२ हजारांच्या आसपास असेल असं  सांगितलं जात असलं तरी याची शक्यता फार कमी असल्याचंही बोललं जात आहे. कारण सध्या आयफोन एसई-२ ची किंमत देखील त्यापेक्षा जास्त आहे. 

iPhone SE 3 चे फिचर्स काय?iPhone SE 3 मध्ये iPhone SE 2020 सारखीच 4.7 इंचाची स्क्रिन असणार आहे. नव्या फोनमध्ये अद्ययावत A15 Bionic चिपसेट देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे याच चिपसेटचा वापर iPhone 13 मध्येही करण्यात आला आहे. म्हणजेच iPhone SE 3 मध्ये 5G सपोर्ट मिळणार आहे. Apple कडून नवा आयफोन एसई-३ हा 4GB RAM आणि 256GB च्या स्टोरेजमध्ये उपलब्ध होऊ शकतो. 

याआधीच्या SE मॉडेल प्रमाणेच याफोनमध्ये 12MP चा सिंगल रिअर कॅमेरा आणि 8MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध करुन दिला जाऊ शकतो. बॅटरीबाबत बोलायचं झालं तर iPhone SE 2020 मध्ये 1821mAh क्षमतेची बॅटची देण्यात आली होती. पण iPhone SE 3 मध्ये त्यापेक्षा अधिक क्षमतेची बॅटरी उपलब्ध करुन दिली जाऊ शकते. Apple Spring Event मध्ये हा फोन लॉन्च होण्याची शक्यता आहे. स्प्रिंग इव्हेंट मार्च किंवा एप्रिल महिन्यात होतो. याआधीच्या रिपोर्टचा हवाला द्यायचा झाला तर iPhone SE 3 भारतात ४० हजारांच्या किमतीत लॉन्च केला जाऊ शकतो असं नमूद करण्यात आलं होतं. 

टॅग्स :Apple IncअॅपलMobileमोबाइल