कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 17:19 IST2025-11-10T17:18:33+5:302025-11-10T17:19:28+5:30
कंपनी आता अशा फीचर्सवर काम करत आहे ज्यामुळे नेटवर्कशिवाय मेसेज आणि मॅपचा वापर करता येईल.

कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
Apple आयफोनमध्ये अनेक एडवान्स फीचर्स आणत आहे. कंपनी आता अशा फीचर्सवर काम करत आहे ज्यामुळे नेटवर्कशिवाय मेसेज आणि मॅपचा वापर करता येईल. Appleआयफोनमध्ये नवीन सॅटेलाइट फीचर्स सादर करण्याची तयारी करत आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, कंपनी मॅप्स आणि मेसेजेस सारख्या आयफोन फीचर्समध्ये सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी जोडण्याची योजना आखत आहे. याचा अर्थ युजर्स मोबाईल सिग्नल नसलेल्या ठिकाणीही मॅप्स वापरून रस्ता शोधू शकतील किंवा मेसेज पाठवू शकतील.
Apple त्यांच्या युजर्ससाठी आयफोनला आणखी उपयुक्त बनवण्यासाठी काम करत आहे. आयफोन आधीच "इमर्जन्सी एसओएस व्हाया सॅटेलाइट" फीचर ऑफर करतंय, जो आयफोन १४ सह सादर करण्यात आला होता. यामुळे युजर्सना सेल्युलर सर्व्हिसशिवायही बचाव टीमशी संपर्क साधता येतो. त्यानंतर कंपनीने कमी नेटवर्क असलेल्या भागात अडकलेल्या ड्रायव्हर्ससाठी रोडसाईड असिस्टन्स जोडला. Appleआता नेटवर्कशिवायही मॅप्स आणि मेसेजेससारख्या आवश्यक सेवांना एक्सेस देणार आहे.
हे साध्य करण्यासाठी, कंपनीचा इंटरनल सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी ग्रुप नवीन तंत्रज्ञान विकसित करत आहे जे आयफोनला थेट सॅटेलाईटशी जोडेल. ही टीम ग्लोबलस्टारसोबत जवळून काम करत आहे, जी Apple च्या विद्यमान एसओएस फीचर्सना शक्ती देणारी सॅटेलाईट ऑपरेटर आहे. भविष्यातील सुविधांना समर्थन देण्यासाठी कंपनी ग्लोबलस्टारच्या नेटवर्कमध्ये अपग्रेड करण्यासाठी फंड देखील देत आहे.
सध्या युजर्सना सॅटेलाईट कनेक्शन स्थापित करण्यासाठी त्यांचे आयफोन आकाशाकडे निर्देशित करावे लागतात. पण येणाऱ्या सिस्टममध्ये हे असं असणार नाही. यामुळे आयफोन खिशात, कारमध्ये किंवा बॅगेत ठेवले तरीही कनेक्टेड राहू शकतील. शिवाय, कंपनी एप डेव्हलपर्ससाठी एक फ्रेमवर्क विकसित करत आहे जे थर्ड पार्टी एप्सना सॅटेलाईट कनेक्शन वापरण्याची परवानगी देईल. याचा अर्थ असा की प्रवास, आरोग्य किंवा सुरक्षिततेशी संबंधित एप्स इंटरनेट कनेक्शनशिवाय देखील कार्य करू शकतील.