Apple iPhone 12 series to launch today; Know the approximate price and features | अ‍ॅपल iPhone 12 सिरीज आज लाँच होणार; जाणून घ्या अंदाजे किंमत आणि फिचर्स

अ‍ॅपल iPhone 12 सिरीज आज लाँच होणार; जाणून घ्या अंदाजे किंमत आणि फिचर्स

स्मार्टफोन क्षेत्रातली दिग्गज कंपनी अ‍ॅपल आज मोठा इव्हेंट (Apple Event) करणार आहे. यामध्ये iPhone 12 सिरीज लाँच होण्याची शक्यता आहे. कंपनी या सिरीजमध्ये एकाचवेळी चार फोन बाजारात आणण्याची शक्यता आहे. हा एक ऑनलाईन इव्हेंट असणार आहे. याची सुरुवात रात्री 10.30 वाजता होणार आहे. हा इव्हेंट Apple Events ची वेबसाईट किंवा यूट्यूब चॅनलवर पाहू शकतात. 

Reliance चा अटकेपार डंका; बनला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ब्रँड, Appleचे स्थान धोक्यात


एका रिपोर्टनुसार कंपनी चार मॉडेल लाँच करू शकते. यामध्ये iPhone 12, iPhone 12 Pro, iPhone 12 Pro Max आणि iPhone 12 mini असू शकतात. हे चारही मॉडेल 5 जी सपोर्ट करणारे असतील. नवीन आयफोनशिवाय कंपनी नवीन HomePod mini किंवा ओव्हर द इयर हेडफोन लाँच करू शकते. 


iPhone 12 सिरीजची अंदाजे किंमत
iPhone 12 च्या अंदाजे किंमतीही चर्चेत आहेत. आयफोन 12 मिनी यामध्ये सर्वात स्वस्त फोन असेल. याची किंमत 699 डॉलर (51,200 रुपये) असू शकते. तर आयफोन १२ ची सुरुवातीची किंमत 799 डॉलर (58,600 रुपये), आयफोन 12 प्रोची सुरुवातीची किंमत 999 डॉलर (73,200 रुपये) आणि आयफोन 12 मॅक्स प्रोची किंमत 1,099 डॉलर (80,600 रुपये) असण्याची शक्यता आहे. 

मान गए Apple! तैवानच्या खांद्यावर बंदूक ठेवून चीनवर जबरी वार; प्रकल्पच भारतात हलवणार


डिस्प्ले स्पेसिफिकेशन्स 
आयफोन मिनीमध्ये 5.4 इंच डिस्प्ले, , 12 आणि 12 प्रोमध्ये 6.1 इंच डिस्प्ले, 12 प्रो मॅक्समध्ये 6.7 इंच डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. या सिरीजचे डिस्प्ले OLED सुपर रेटिना XDR असण्याची शक्यता आहे. यावर सुरक्षेसाठी सिरॅमिक शील्ड ग्लास असणार आहे. 

Apple आणणार वनप्लस 7T पेक्षाही स्वस्त आयफोन

 

कॅमेरा
नवीन मॉडेल्सनुसार ए14 बायोनिक चिपसेट आणि 15वॉट वायरलेस चार्जिंग मिळू शकते. याला कंपनी MagSafe नाव देऊ शकते. आयफोन १२ मिनी आणि आयफोन १२ मध्ये ड्यूअल रिअर कॅमेरा असून शकते. तर अन्य दोन फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असेल. 


Apple iPhone 12 स्पेसिफिकेशन्स
परफॉर्मंस    Apple A13 Bionic
स्टोरेज    64 GB
कॅमरा    12MP + 12MP + 12MP
बॅटरी    3210 mAh
डिस्प्ले    6.1" (15.49 cm)
रॅम    6 GB

Web Title: Apple iPhone 12 series to launch today; Know the approximate price and features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.