शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बाबो! iPhone सोबत चार्जर न देणं Apple ला पडलं चांगलंच महागात; तब्बल 14 कोटींचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 15:41 IST

Apple iPhone : आयओएस अपडेट केले त्यानंतर त्यांच्या फोनमध्ये अडचणी येऊ लागल्या आहेत. अ‍ॅपलने या अडचणीबाबतही युजर्सची कोणतीही मदत केली नाही असंही प्रोकॉन- एसपीने म्हटलं आहे. 

जगातील दिग्गज फोन मेकर कंपनी अ‍ॅपल (Apple) ला आपल्या आयफोन 12 सीरीजच्या फोनची चार्जरशिवाय विक्री करणं चांगलंच महागात पडलं आहे. 9to5Google च्या रिपोर्टनुसार, ब्राझीलमधील ग्राहक संरक्षण संस्था Procon-SP ने अ‍ॅपलला 2 मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल 14 कोटींचा दंड ठोठावला आहे. अ‍ॅपल कंपनीने आयफोन-12 सह चार्जर न दिल्याने कंपनीला हा दंड ठोठावण्यात आला आहे. अ‍ॅपलने हा निर्णय घेताना पर्यावरणाचा फायदा होणार आहे, असं म्हटलं. मात्र आता त्यांच्या या निर्णयामुळे पर्यावरणाचा फायदा होतोय, हे सिद्ध होऊ शकलं नाही असं प्रोकॉन- एसपीने म्हटलं आहे.

अ‍ॅपलने  हँडसेटसह चार्जर दिला नाही. तरीदेखील फोनची किंमत कमी का केली नाही, असा प्रश्नही प्रोकॉन- एसपीने उपस्थित केला. अ‍ॅपलने चार्जरशिवाय आणि चार्जरसह फोनची किंमत किती असेल याची माहिती दिली नाही. बॉक्समध्ये युजर्सना चार्जर न दिल्याने वातावरणाचा कसा आणि किती फायदा झाला असा प्रश्न प्रोकॉन-एसपीने विचारला. मात्र अ‍ॅपलने याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. युजर्सनी आयओएस अपडेट केले त्यानंतर त्यांच्या फोनमध्ये अडचणी येऊ लागल्या आहेत. अ‍ॅपलने या अडचणीबाबतही युजर्सची कोणतीही मदत केली नाही असंही प्रोकॉन- एसपीने म्हटलं आहे. 

ब्राझीलमध्ये ग्राहक संरक्षणाविषयी कठोर नियम आहेत. अ‍ॅपलने गेल्या वर्षी 'आयफोन 12' लाँच केला होता. नवीन मॉडेल चार्जरसह येणार नाही. तसंच बॉक्समध्ये तुम्हाला इयरबड्सही मिळणार नसल्याचं कंपनीने म्हटलं होतं. ई-वेस्टच्या (इलेक्ट्रॉनिक कचरा) त्रासापासून पर्यावरणाला वाचवायचं आहे यासाठी असा निर्णय घेतला असल्याचं कंपनीने म्हटलं होतं. अ‍ॅपलच्या या निर्णयाचे अनुकरण सॅमसंग कंपनीदेखील करणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Apple सुस्साट! 4G, 5G ला विसरा आता 6G येणार; कंपनी लवकरच सुरू करणार काम

अ‍ॅपलने (Apple) आपल्या नव्या उत्पादनांची सीरिज लाँच करत असतं. यानंतर आता अ‍ॅपल 6G वायरलेस तंत्रज्ञान विकसित करण्याची तयारी करत आहे. कंपनीने सध्याच पहिली 5G सपोर्ट असलेली iPhone सीरीज iPhone 12 च्या रुपात सुरू केली आहे. त्यानंतर आता कंपनी सहाव्या पिढीच्या सेल्युलर कनेक्टिव्हिटी म्हणजेच 6G वर काम सुरू करण्याची तयारी दर्शवl आहे. अ‍ॅपलने इंटेल प्रोसेसरला त्याच्या मॅकबुक मालिकेत बदलण्यासाठी स्वत: ची M1 चिप तयार केली आणि आता 6G विकसित करण्याची कंपनीची तयारी दर्शवली असून यामुळे अ‍ॅपल कोणावरही अवलंबून राहू निश्चित असल्याचं स्पष्ट होत आहे. 

तंत्रज्ञानाच्या दिग्गज कंपनीने या आठवड्यात नेक्स्ट जनरेशन नेटवर्क तंत्रज्ञानासाठी वायरलेस सिस्टीम रिसर्च इंजिनिअर्स शोधणे सुरू केलं आहे. कंपनीने या नोकरीसाठी जाहिरात देखील दिली आहे. या सूचनेनुसार नोकरी सिलिकॉन व्हॅली आणि सॅन डिएगो येथील अ‍ॅपलच्या कार्यालयांसाठी आहेत. जिथे कंपनी वायरलेस तंत्रज्ञान आणि चिप डिझाइनवर काम करते. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने निवडलेले लोक रेडिओ अ‍ॅक्सेस नेटवर्कसाठी वायरलेस कम्युनिकेशन सिस्टमची पुढील पिढी डिझाइन आणि रिसर्च करणार आहेत. 

 

टॅग्स :Apple Incअॅपलtechnologyतंत्रज्ञान