आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 11:26 IST2025-09-10T11:25:21+5:302025-09-10T11:26:44+5:30

iPhone 17 SeriesL Lauched: अ‍ॅपलने नुकतीच त्यांची नवीन आयफोन १७ सिरीज लॉन्च केली आहे.

Apple Event 2025: Everything Apple launched; iPhone 17, iPhone Air, 17 Pro, iPhone Pro Max prices in India | आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...

आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...

अ‍ॅपलने नुकतीच त्यांची नवीन आयफोन १७ सिरीज लॉन्च केली आहे. या सिरीजमध्ये अनेक नवीन फीचर्स देण्यात आले असले, तरी काही लोकप्रिय गोष्टी काढून टाकण्यात आल्या आहेत. दरम्यान, नवीन आयफोन खरेदी करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी तुम्हाला मिळणार नाहीत? ते जाणून घेऊयात.

१२८ जीबी स्टोरेजचा पर्याय नाही
यावेळी अ‍ॅपलने आयफोन १७, आयफोन एअर, आयफोन प्रो आणि आयफोन प्रो मॅक्स या मॉडेल्समध्ये १२८ जीबी स्टोरेजचा पर्याय दिलेला नाही. त्यामुळे नवीन आयफोन खरेदी करणाऱ्यांना किमान २५६ जीबी स्टोरेज असलेले मॉडेल खरेदी करावे लागेल. अनेक वापरकर्त्यांची स्टोरेज लवकर भरून जाण्याची तक्रार यामुळे दूर होऊ शकते.

'प्लस' मॉडेल गायब
आयफोनची प्लस मॉडेल्स मध्यम बजेट असलेल्या ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय होती. ज्यांना बेस व्हेरिएंटपेक्षा मोठा डिस्प्ले हवा होता, पण प्रो मॉडेलसाठी जास्त पैसे खर्च करायचे नव्हते, त्यांच्यासाठी प्लस मॉडेल उत्तम पर्याय होता. मात्र, आयफोन १७ सिरीजमध्ये कंपनीने कोणतेही प्लस मॉडेल लाँच केले नाही. त्याऐवजी, आयफोन १७ एअर सादर केला आहे, जो कंपनीचा सर्वात पातळ आयफोन आहे. त्यामुळे, प्लस मॉडेलच्या चाहत्यांना आता आयफोन प्रो हाच पर्याय निवडावा लागेल.

प्रो मॉडेल्समध्ये ब्लॅक कलर नाही
ब्लॅक रंग हा आयफोन प्रेमींसाठी एक महत्त्वाचा पर्याय असतो आणि भारतात तो खूप लोकप्रिय आहे. पण आयफोन १७ च्या प्रो आणि प्रो मॅक्स मॉडेल्समध्ये काळ्या रंगाचा पर्याय उपलब्ध नाही. या टॉप मॉडेल्सना कॉस्मिक ऑरेंज, डीप ब्लू आणि सिल्व्हर या तीनच रंगांमध्ये लॉन्च करण्यात आले. आयफोन १७ मध्ये मात्र काळा रंग उपलब्ध आहे.

किंमतीत वाढ
गेल्या वर्षी आयफोन १६ च्या १२८ जीबी मॉडेलची सुरुवातीची किंमत ₹७९,९०० होती. पण यावेळी १२८ जीबी मॉडेल उपलब्ध नसल्याने, आयफोन १७ च्या २५६ जीबी मॉडेलची सुरुवातीची किंमत ८२ हजार ९०० रुपये ठेवण्यात आली आहे. केवळ ३ हजार रुपये जास्त देऊन वापरकर्त्यांना दुप्पट स्टोरेज मिळत आहे. ही किंमत वाढ जरी कमी वाटत असली, तरी बेस मॉडेलची सुरुवातीची किंमत वाढली आहे.

Web Title: Apple Event 2025: Everything Apple launched; iPhone 17, iPhone Air, 17 Pro, iPhone Pro Max prices in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.