अ‍ॅपलच्या खास कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमातून अ‍ॅपल अनेक नवी उत्पादनं लॉन्च करणार आहे. यामध्ये आयपॅड, आयफोन्सचा समावेश आहे. अ‍ॅपलचे सीईओ टिम कूक यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. जूनमध्ये झालेल्या एका सोहळ्यात अ‍ॅपलनं नव्या स्मार्टवॉचची घोषणा केली होती. त्यामुळे अ‍ॅपलनं आजच्या कार्यक्रमाची सुरुवात स्मार्टवॉचची नवी सीरिजच्या लॉन्चिंगनं केली.  

LIVE UPDATES:
- अ‍ॅपलकडून स्मार्टवॉचची सहावी सीरिज (Apple Watch 6 Series) लॉन्च; रक्तातील ऑक्सिजन अवघ्या १५ सेकंदांत मोजण्याची सुविधा; सिंगापूरातल्या कोरोना वॉरियर्सना नवं वॉच दिलं जाणार- अ‍ॅपल वॉच ६ सीरिजची किंमत ३९९ अमेरिकन डॉलरपासून सुरू

- अ‍ॅपल वॉच एसई (Apple Watch SE) लॉन्च; एसईमध्ये एस५ चीपसेटचा वापर; ई-सिमला सपोर्ट करणार; किंमत २७९ अमेरिकन डॉलर्सपासून सुरू- नवा आयपॅड (8th Generation Apple iPad) लॉन्च; पेन्सिल आणि रेटिना डिस्प्लेची सुविधा; आयपॅडमध्ये A12 चिपसेटचा वापर; गेमिंगची आवड असणाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन आयपॅडची निर्मिती; किंमत ३२९ अमेरिकन डॉलर- आयपॅड एअर (iPad Air) लॉन्च; किंमत ३२९ अमेरिकन डॉलरपासून सुरू; विद्यार्थ्यांना २९९ डॉलरमध्ये मिळणार; बुकिंगला आजपासून सुरुवात- iPad Air मध्ये ७ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर रिअर कॅमेरा १२ मेगापिक्सलचा आहे. यामध्ये 4K 60p व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि स्टिरियो स्पीकर्सची सुविधा आहे.

Web Title: Apple Event 2020 LIVE Updates Apple launches iPad Watch Series 6 iPad Air fitness plus workout services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.