अ‍ॅपलनं एका खास कार्यक्रमाच्या माध्यमातून नव्या उत्पादनाचं लॉन्चिंग केलं. कोरोना संकट असल्यानं संपूर्ण सोहळा ऑनलाईन संपन्न झाला. अ‍ॅपलनं नवीन वॉच सीरिज, आयपॅड, आयपॅड एअर लॉन्च केलं आहे. यामध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स देण्यात आली आहे. कोरोना काळातील आरोग्याचा विचार करता कंपनीनं स्मार्टवॉचच्या सहाव्या सीरिजमध्ये रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण मोजणारं फीचर दिलं आहे.अ‍ॅपलकडून स्मार्टवॉचची सहावी सीरिज (Apple Watch 6 Series) लॉन्च करण्यात आली आहे. या सीरिजची किंमत ३९९ अमेरिकन डॉलरपासून सुरू होते. रक्तातील ऑक्सिजन अवघ्या १५ सेकंदांत मोजण्याची सुविधा यामध्ये देण्यात आली आहे. भारतात Apple Watch 6 Series (GPS) ची किंमत ४० हजार ९०० रुपयांपासून सुरू होईल. तर Apple Watch Series 6 (GPS Cellular) ४९ हजार ९०० रुपयांनी सुरू होईल. Apple Watch SE (GPS) ची किंमत तुलनेनं कमी आहे. हे स्मार्टवॉच २९ हजार ९०० रुपयांपासून उपलब्ध असेल. तर Apple Watch SE (GPS Cellular) ची किंमत ३३ हजार ९०० रुपयांपासून सुरू होईल.iPad (8th generation) मध्ये पेन्सिल आणि रेटिना डिस्प्लेची सुविधा देण्यात आली आहे. आयपॅडमध्ये A12 चिपसेटचा वापर करण्यात आला असून गेमिंगची आवड असणाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन याची निर्मिती करण्यात आली आहे. वाय-फाय मॉडेल, वाय-फाय अधिक सेल्युलर मॉडेल अशा विविध सुविधांसह आयपॅड उपलब्ध होईल. त्यात ३२ जीबी आणि १२८ जीबी असे पर्याय आहेत. त्यांची किंमत २९ हजार ९०० रुपयांपासून ४१ हजार ९०० रुपयांपर्यंत असेल.आयपॅड एअर (iPad Air) भारतात ऑक्टोबरमध्ये उपलब्ध होईल. आयपॅड एअरच्या वायफाय मॉडेलची किंमत ५४ हजार ९०० रुपयांपासून सुरू होईल. तर वाय-फाय प्लस सेल्युलर मॉडेलची किंमत ६६ हजार ९०० रुपयांपासून सुरू होईल. ६४ जीबी आणि २५६ जीबी अशा दोन पर्यायांमध्ये आयपॅड एअर उपलब्ध असेल.

Web Title: Apple Event 2020 apple launched Watch SE Watch Series 6 iPad Air know features and price in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.