Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 23:45 IST2025-09-09T23:41:58+5:302025-09-09T23:45:51+5:30
Apple Awe Dropping Event : यावेळी iPhone 17 मध्ये Pro Motion डिस्प्ले देण्यात आला आहे. यापूर्वी हा केवळ Pro मॉडेल्समध्येच दिला जात होता.

Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
Apple Event 2025 : टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी ॲपलचा बहुप्रतीक्षित वार्षिक मेगा इव्हेंट आज पार पडत आहे. या इव्हेंडमध्ये आतापर्यंत नव्या एअरपॉड्स आणि स्मार्टवॉचसह iPhone 17 सीरीजअंतर्गत चार नवे मॉडेल्स देखील लाँच केले आहेत. यावेळी iPhone 17 मध्ये Pro Motion डिस्प्ले देण्यात आला आहे. यापूर्वी हा केवळ Pro मॉडेल्समध्येच दिला जात होता.
देण्यात आले आहे A19 चिपसेट -
iPhone 17 मध्ये कंपनीने A19 चिपसेट दिले आहे. यात 6 कोर सीपीयू आहे. कंपनीच्या मते हा अधिक चांगला आहे. याशिवाय या मोबाईलमध्ये 5 कोर GPU देण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे, यात युजर्स हेव्ही ग्राफिक्स असलेले गेम्सदेखील चलवू शकतील, असे कंपनीने म्हटले आहे. तसेच, गेल्या वेळच्या तुलनेत हा मोबाईल अधिक फास्ट असेल, असेही कंपनीने म्हटले आहे.
48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा -
iPhone 17 मध्ये दोन रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. याच बरोबर 2X चा ऑप्टिकल झूमही देण्यात आला आहे. आधीच्या व्हर्जनच्या तुलनेत, कॅमेरा अधिक चांगला आहे. याशिवाय मोबाईलला, Center Stage सेल्फी कॅमेरादेखील देण्यात आला असल्याचेही कंपनी म्हटले आहे. गेल्या वेळच्या तुलनेत, सेल्फी कॅमरा सेंसर दुपटीहूनही अधिक मोठे आहे, जे अधिक लाइट कॅप्चर करेल आणि बेटर पिक्चर क्वॉलिटी देईल.
हेही वाचा - Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
iPhone 17 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स असे... -
20 मिनिटांत होणार चार्ज -
अॅपल आयफोन 17 फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. हा फोन केवळ 20 मिनिटांत 50 टक्के चार्ज होईल, असा दावा करण्यात आला आहे. या फोनला व्हिज्युअल इंटेलिजंन्स फीचर येईल. लाइव्ह ट्रान्सलेशनची सुविधा असेल. युजर्सना ऑल डे बॅटरी लाइफ मिळेल. असा दावाही कंपनीकडून करण्यात आला आहे.
हेही वाचा - Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस