Apple announces iPhone 11 series know all features and price in india | iPhone 11: अ‍ॅपलकडून तीन नवे फोन लॉन्च; जाणून घ्या किती असणार किंमत
iPhone 11: अ‍ॅपलकडून तीन नवे फोन लॉन्च; जाणून घ्या किती असणार किंमत

कॅलिफॉर्निया: अ‍ॅपलनं आयफोन 11 सीरिज लॉन्च करण्यात आली आहे. यामध्ये तीन फोन्सचा समावेश आहे. iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max या महिन्याच्या अखेरीस भारतात विक्रीसाठी उपलब्ध होतील. आयफोन 11 सीरिजमधील फोन्सची किंमत 699 डॉलरपासून सुरु होणार आहे. या नव्या फोन्समध्ये A13 बायोनिक चिपसेट असेल. 

iPhone 11 ची भारतातील किंमत 64,900 रुपयांपासून सुरू होईल. यामध्ये 64 जीबी मेमरी असेल. याशिवाय हा फोन 128 जीबी आणि 256 जीबी वेरिएंटमध्येही उपलब्ध असेल. iPhone Pro भारतात 99,900 रुपयांपासून उपलब्ध होईल. तर iPhone 11 Pro Max ची किंमत 1,09,900 रुपयांपासून सुरू होईल. iPhone Pro आणि iPhone 11 Pro Max च्या या किमती 64 जीबी वेरिएंटच्या आहेत. याशिवाय हे दोन्ही फोन्स 256 जीबी आणि 512 जीबी मेमरी सुविधेसह उपलब्ध असतील. भारतात 27 सप्टेंबरपासून या फोन्सची विक्री सुरू होईल. iPhone 11 पाच रंगांमध्ये उपलब्ध असेल. या फोनमध्ये 6.1 इंचाची LCD IPS HD स्क्रीन असेल. कंपनीनं या फोनमध्ये A13 बायोनिक प्रोसेसर दिला आहे. या फोनची बॅटरी iPhone XR च्या तुलनेत जास्त वेळ चालेल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. हा फोन पाण्याखाली 2 मीटरपर्यंत जवळपास अर्धा तास उत्तम स्थितीत राहू शकतो. iPhone 11 चा फ्रंट कॅमेरा 12 मेगापिक्सलचा आहे. तर बॅक साईडला 12-12 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. 

Web Title: Apple announces iPhone 11 series know all features and price in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.