अॅपलनेही घेतली भारतीय रुपयाची धास्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 12:41 IST2018-11-02T10:25:09+5:302018-11-02T12:41:24+5:30
जगप्रसिद्ध मोबाईल कंपनी अॅपलने जुलै-सप्टेंबरमधील तिमाहीचा निकाल जाहीर केला.

अॅपलनेही घेतली भारतीय रुपयाची धास्ती
सॅनफ्रान्सिस्को : जगप्रसिद्ध मोबाईल कंपनी अॅपलने जुलै-सप्टेंबरमधील तिमाहीचा निकाल जाहीर केला. वार्षिक आधारावर फायदा 32 टक्के आणि आयफोनपासूनची कमाई 29 टक्क्यांनी वाढली आहे. मात्र, भारतीय रुपया घसरत असल्याने कंपनी दबावात असल्याची कबुली अॅपलचे कार्यकारी अधिकारी टीम कूक यांनी दिली आहे.
डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया दिवसेंदिवस कोसळत आहे. आज रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत 73.10 रुपये आहे. भारतात रुपयाची घसरण अॅपलसाठी मोठे आव्हान ठरत आहे. भविष्यात भारतातील मोठा समुदाय मध्यम वर्गात मोडणार आहे. भारत सरकार आर्थिक सुधारणांसाठी मोठी पाऊले उचलत आहे, असेही कूक म्हणाले.
गेल्या तिमाहीत आयफोनच्या विक्रीत मोठी वाढ न होताही वार्षिक आधारावर फायदा 32 टक्क्यांनी वाढून 14.13 अब्ज डॉलर राहिला आहे. यातून आयफेनला 29 टक्के फायदा झाला आहे. याला कारण म्हणजे आयफोनच्या वाढलेल्या किंमती आहेत. आयफोनची सरासरी किंमत 618 डॉलरवरून 793 डॉलर झाली आहे.
गेल्या वर्षी लाँच केलेल्या आयफोन एक्सची किंमत 999 डॉलर होती. तर यंदा लाँच केलेल्या आयफोन एक्सएस मॅक्सची किंमत 1099 डॉलर आहे.