कमाल! 9व्या वर्षी तयार केले अॅप, भारतीय मुलीचे Appleच्या CEOने केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 08:31 PM2022-09-27T20:31:43+5:302022-09-27T20:36:28+5:30

9 वर्षीय भारतीय मुलीने अॅपलचे सीईओ टिम कुक यांना इंप्रेस केले.

App created by 9-year-old Indian girl, praised by Apple CEO Tim Cook | कमाल! 9व्या वर्षी तयार केले अॅप, भारतीय मुलीचे Appleच्या CEOने केले कौतुक

कमाल! 9व्या वर्षी तयार केले अॅप, भारतीय मुलीचे Appleच्या CEOने केले कौतुक

Next

Apple CEO: टेक जगतात Appleचे CEO टिम कुक यांचे मोठे नाव आहे. त्यांनी आता एका 9 वर्षीय भारतीय मुलीचे कौतुक केले आहे. ही मुलगी अगदी लहान वयात iOS अॅप डेव्हलपर म्हणून काम करत आहे. तिने पाठवलेल्या ईमेलला प्रतिसाद म्हणून कुक यांनी तिचे सर्वात तरुण अॅप डेव्हलपर म्हणून अभिनंदन केले.

दुबईत राहणाऱ्या या भारतीय वंशाच्या तरुणीचे नाव हाना मोहम्मद रफिक आहे. हानाने टीम कूक यांना तिच्या स्टोरीटेलिंग अॅप हानास (Hanas)बद्दल सांगणारा ईमेल पाठवला. हे अॅप स्वतः तिने विकसित केले आहे. हानास एक मोफत iOS अॅप आहे, ज्यात पालक त्यांच्या मुलांसाठी कथा रेकॉर्ड करू शकतात.

लहानपणापासून कोडिंगची आवड
हानाने सांगितले की, तिने हानास अॅप फक्त आठ वर्षांची असताना तयार केले होते. तिने सांगितल्यानुसार, हे अॅप बनवण्यासाठी तिला सुमारे 10,000 ओळींचा कोड लिहावा लागला. हाना म्हणाली की, ती पाच वर्षांची असल्यापासून कोडिंग करत आहे. अॅप तयार करण्यासाठी ती कोणतीही प्री-मेड थर्ड-पार्टी लायब्ररीज, क्लासेज किंवा कोड्सची मदद घेत नाही.

कुक यांनी केले कौतुक
टीम कुक यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये हानाने अॅपलच्या सीईओंना अॅपचे प्रिव्हू करण्याची विनंती केली होती. या ईमेलला उत्तर देताना टिम कुक यांनी, एवढ्या लहान वयात अॅप तयार केल्याबद्दल हानाचे अभिनंदन केले. हाना अशीच काम करत राहिली, तर भविष्यात ती आणखी चांगले काम करू शकेल, असे कुक म्हणाले.

हाना बहिणीसोबत कोडिंग करते
हाना आणि तिची बहीण लीना, या दोघींनीही पालकांच्या मदतीने कोडिंग शिकले आहे. हानाच्या बहिणीने एक वेबसाइट तयार केली आहे, ज्याच्या मदतीने मुलांना शिकवले जाऊ शकते. भारतीय वंशाच्या हानाला पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जायचे आहे. तिने अॅपलमध्ये नोकरी करण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे.

Web Title: App created by 9-year-old Indian girl, praised by Apple CEO Tim Cook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.