Android apps crashed for users Google working on a fix | अँड्रॉईड ऍप्स क्रॅश होत असल्यानं ग्राहकांना मनस्ताप; 'अशी' सोडवा समस्या

अँड्रॉईड ऍप्स क्रॅश होत असल्यानं ग्राहकांना मनस्ताप; 'अशी' सोडवा समस्या

भारतासह जगभरातील अँड्राईड वापरकर्त्यांना ऍप्स वापरताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ऍप्स वारंवार क्रॅश होत असल्यानं वापरकर्त्यांना अडचणी येत आहेत. ही समस्या सोडवण्यासाठी काम सुरू असल्याची माहिती गुगलकडून देण्यात आली आहे. (Android apps crashed for users Google working on a fix)

अँड्रॉईडवर जी-मेल संदर्भात तांत्रिक समस्या उद्भवल्याचं गुगलनं सांगितलं आहे. गुगलनं वर्कस्पेस स्टेटस पेजवर याबद्दलची माहिती दिली आहे. समस्येचं निराकरण होईपर्यंत डेस्कटॉप व्हर्जनचा वापर करण्याची शिफारस गुगलनं केली आहे.

'जी-मेलबद्दलच्या समस्येचा फटका अनेकांना सहन करावा लागत असल्याची जाणीव आम्हाला आहे. या वापरकर्त्यांना जी-मेल ऍक्सेस करता येत नाहीए. ही समस्या केव्हापर्यंत संपुष्टात येईल याबद्दलचं अपडेट आमच्याकडून देण्यात येईल,' असं गुगलनं म्हटलं आहे. समस्येचा सामना करणाऱ्यांनी जीमेल अँड्रॉईड ऍपऐवजी डेस्कटॉप जीमेल वेब इंटरफेसचा वापर करावा, असा सल्ला कंपनीकडून देण्यात आला आहे.

सॅमसंगनंदेखील या समस्येची दखल घेऊन उपाय सुचवला आहे.
कृपया वेबव्ह्यू अपडेट रिमूव्ह करा आणि फोन रिस्टार्ट करा, असं सॅमसंगनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

अनेक अँड्रॉईड वापरकर्त्यांना जी-मेल ऍप वापरत असताना अडचणी येत आहेत. ऍप वारंवार क्रॅश होत असल्यानं समस्यांचा सामना करावा लागत आहे.
ही समस्या कशी सोडवाल-

सेटिंग्समध्ये जा. ऍप्स पर्याय निवडा. उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा. तिथून शो सिस्टम ऍप्स पर्याय निवडा. मग सर्च फॉर ऍड्रॉईड सिस्टम वेबव्ह्यूव क्लिक करा. यानंतर अनइन्स्टॉल अपडेट्स पर्याय निवडा.

Read in English

Web Title: Android apps crashed for users Google working on a fix

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.