Ambrane नं भारतात आपला नवीन Smartwatch सादर केला आहे. भारतीय कंपनीनं देशात FitShot Zest लाँच केला आहे. यात SpO2 सेन्सर, हार्ट रेट मॉनिटर, 7 दिवसांचा बॅटरी बॅकअप आणि IP67 रेटिंग देण्यात आली आहे. या स्मार्टवॉचची किंमत 4999 रुपये ठेवण्यात आली आहे. जो ब्लॅक, ब्लू आणि पिंक कलरमध्ये अॅमेझॉनवरून विकत घेता येईल
Ambrane Fitshot Zest चे स्पेक्स
FitShot Zest मध्ये 1.7 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात Spo2, ब्लड प्रेशर, स्लीप, हार्ट रेट मॉनिटरिंग आणि इतर अनेक हेल्थ फीचर्स देण्यात आले आहेत. जे चौवीस तास तुमचं आरोग्य ट्रॅक करतात. यात स्टेप ट्रॅकर, कॅलरी बर्न, अॅक्टिव्हिटी हिस्ट्री सारखे फीचर्स देखील मिळतात. महिलांसाठी यूनिक पीरियड ट्रॅकर मिळतो. वॉटर आणि डस्ट रेजिस्टन्ससाठी IP67 रेटिंग देण्यात आली आहे.
यात 60 पेक्षा जास्त क्लाउडबेस्ड वॉच फेस वापरून वॉच कस्टमाइज्ड करता येईल. यात व्हॉइस असिस्टंट फिचर देण्यात आलं आहे. तसेच ब्लूटूथ कॉलिंगच्या मदतीने स्मार्टवॉचवरूनच कॉल करता येईल. तुम्ही स्मार्टफोनवरील म्युजिक आणि कॅमेरा देखील या वॉचवरून कंट्रोल करू शकता. Ambrane चा हा वॉच 10 स्पोर्ट्स मोडला सपोर्ट करतो. हा वॉच सिंगल चार्जवर 7 दिवसांपर्यंत वापरता येतो.
हे देखील वाचा: