6,000mAh ची बॅटरी असलेल्या Redmi 9 Power मिळतोय जबरदस्त डिस्काउंट; जाणून घ्या ऑफर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 01:10 PM2021-10-14T13:10:59+5:302021-10-14T13:11:07+5:30

Amazon Sale Offers On Redmi 9 Power: Amazon Great Indian Festival सेल अंतर्गत Redmi 9 Power या Budget सेगमेंटमधील स्मार्टफोनवर डिस्काउंट दिला जात आहे.  

Amazon Offers redmi 9 power available at discounted price in amazon sale   | 6,000mAh ची बॅटरी असलेल्या Redmi 9 Power मिळतोय जबरदस्त डिस्काउंट; जाणून घ्या ऑफर 

6,000mAh ची बॅटरी असलेल्या Redmi 9 Power मिळतोय जबरदस्त डिस्काउंट; जाणून घ्या ऑफर 

Next

शाओमीने या वर्षीच्या सुरुवातीला बजेट सेगमेंटमध्ये Redmi 9 Power हा स्मार्टफोन सादर केला होता. या फोनची खासियत म्हणजे यात मिळणारी 6000mAh ची मोठी बॅटरी आहे. लाँचच्या वेळी हा स्मार्टफोन 10,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला होता. आता Amazon वर सुरू असलेल्या Great Indian Festival सेल अंतर्गत या फोनवर डिस्काउंट मिळत आहे.  

Amazon वरील ऑफर्स  

Redmi 9 Power बँक ऑफर्सचा वापर करून 9,899 रुपयांमध्ये विकत घेता येईल, या ऑफर्स 17 ऑक्टोबर पर्यंत वैध आहेत. यासाठी हा फोन विकत घेताना Axis आणि Citi Bank च्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करावा लागेल. या कार्ड्सवरील नॉन-ईएमआय ट्रेन्जक्शन्सवर 10 टक्के (1,000 रुपयांपर्यंत) डिस्काउंट मिळेल. तर ईएमआय वर हा फोन विकत घेतल्यास 1,250 रुपयांचा डिस्काउंट मिळेल.  

Xiaomi Redmi 9 Power चे स्पेसिफिकेशन्स  

रेडमी 9 पावरमध्ये 6.53 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये क्वाॅलकाॅमचा स्नॅपड्रॅगन 662 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 610 जीपीयूला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 10 आधारित मीयुआय 12 वर चालतो.   

रेडमी 9 पावरमधील क्वाॅड रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी रेडमी 9 पावरमध्ये 18वाॅट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असेलली 6,000एमएएचची मोठी बॅटरीला देण्यात आली आहे.

Web Title: Amazon Offers redmi 9 power available at discounted price in amazon sale  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app