OnePlus: वनप्लसच्या लेटेस्ट 5G फोनवर तगडी ऑफर, किंमत पाहून खूश व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 16:39 IST2025-07-19T16:36:14+5:302025-07-19T16:39:48+5:30
OnePlus Nord CE4 Lite 5G: १५ ते २० हजार रुपयांच्या किंमतीत वनप्लस कंपनीचा 5G फोन खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी एक तगडी डील आहे

OnePlus: वनप्लसच्या लेटेस्ट 5G फोनवर तगडी ऑफर, किंमत पाहून खूश व्हाल!
Smartphones Under 20000: १५ ते २० हजार रुपयांच्या किंमतीत वनप्लस कंपनीचा 5G फोन खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी एक तगडी डील आहे. अॅमेझॉनवर वनप्लस नॉर्ड सीई ४ लाईटच्या (४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज) खरेदीवर ग्राहकांना मोठी सूट दिली जात आहे. अॅमेझॉनवर हा फोन १७ हजार ९९६ रुपयांना उपलब्ध आहे.
या फोनच्या खरेदीवर ग्राहकांना १ हजार रुपयांचे बँक डिस्काऊंट आणि ८९९ रुपयांचे कॅशबॅक ऑफर दिली जात आहे. एवढेच नाही तर, या फोनच्या खरेदीवर ग्राहकांना एक्स्चेंज ऑफर १६ हजार ८५० रुपये वाचता येऊ शकतात. परंतु, एक्स्चेंज ऑफरमध्ये मिळणारी किंमत ग्राहकांच्या जुन्या फोनचा ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून असेल.
अॅमेझॉनवर वनप्लस नॉर्ड सीई ४ लाईटमध्ये ६.६७-इंचाचा फुल एचडी + ओएलईडी डिस्प्ले येतो. हा डिस्प्ले १२०Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. वनप्लसचा हा फोन ८ जीबी रॅम आणि २५६ जीबीपर्यंत स्टोरेज पर्यायासह येतो. या फोनच्या मागील बाजूस फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यात ५० मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. तर, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
ग्राहकांना या फोनमध्ये ५ हजार ५०० एमएएच क्षमता असलेली बॅटरी मिळते, जी ८० वॅट सुपरफास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. बायोमेट्रिक सुरक्षेसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिसेल. हा फोन अँड्रॉइड १४ वर आधारित ऑक्सिजन OS १४ वर काम करतो. कंपनीचा हा फोन IP54 डस्ट आणि वॉटर रेझिस्टन्स रेटिंगसह सुसज्ज आहे. हा फोन अल्ट्रा ऑरेंज, सुपर सिल्व्हर आणि मेगा ब्लू या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो.