शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

आता 1 रुपयात सोने खरेदी करू शकता, Amazon Pay चे नवे फीचर लाँच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 15:28 IST

हे फीचर Paytm, PhonePe, Google Pay, MobiKwik सारख्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना टक्कर देण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देया फीचरच्या माध्यमातून ग्राहकांना डिजिटल सोन्याची खरेदी करण्याची ऑफर देण्यात आली आहे. 

नवी दिल्ली : ई-कॉमर्समधील कंपनी अ‍ॅमेझॉन इंडिया (Amazon India)ची पेमेंट सर्व्हिस अ‍ॅमेझॉन पे (Amazon Pay)ने ग्राहकांसाठी एक उत्तम फीचर आणले आहे. या फिचरला 'गोल्ड वॉल्ट' (Gold Vault) असे नाव देण्यात आले आहे.  या फीचरच्या माध्यमातून ग्राहकांना डिजिटल सोन्याची खरेदी करण्याची ऑफर देण्यात आली आहे. 

अ‍ॅमेझॉनच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, ग्राहक या फीचरमधून १ रुपयाचे सुद्धा सोने देखील खरेदी करू शकतात. अ‍ॅमेझॉन कंपनीने यासाठी सेफगोल्डसोबत भागीदारी केली आहे. सेफगोल्ड हे डिजिटल गोल्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे रिटेल ब्रँड आहे, जे २४ कॅरट ९९५ शुद्धतेचे सोने देते. 'गोल्ड वॉल्ट' या फीचरला लाँच करुन अ‍ॅमेझॉनने मोठ्या संख्येने मध्यम व तरुण ग्राहकांना व्यवस्थापित केले आहे. हे फीचर Paytm, PhonePe, Google Pay, MobiKwik सारख्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना टक्कर देण्याची शक्यता आहे.

अ‍ॅमेझॉनच्या म्हणण्यानुसार, या फीचरच्या माध्यमातून ग्राहक डिजिटल रूपात सोन्यात १ रूपयाची गुंतवणूक करु शकतात. तसेच, जर सोने त्यांना हवे असल्यास कोणत्याही केवायसीशिवाय २ ग्रॅम पर्यंत खरेदी करू शकतात. मात्र, सुरुवातीला गोल्ड वॉल्टच्या माध्यमातून आपल्याला कमीतकमी ५ रुपयांच्या रकमेचे डिजिटल सोने खरेदी करावे लागते.

दरम्यान, डिजिटल सोन्याच्या खरेदीची ही कल्पना नवीन नाही. यापूर्वी PhonePe, Paytm, MobiKwik आणि Google Pay सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसह इतर अनेक कंपन्यांनी असे फीचर लाँच केले आहे आणि त्या आधीपासून डिजिटल सोन्याची विक्री करीत आहेत. Google Pay ने गेल्या वर्षी एप्रिलमध्येच डिजिटल सोन्यात गुंतवणूक करण्याची ऑफर आणली होती. त्याच वेळी, Paytm आणि PhonePe यांनाही २०१७ मध्ये आपल्या प्लॅटफॉर्मवर डिजिटल सोन्याची ऑफर देण्यास सुरुवात केली, तर गुरुग्रामच्या मोबिक्विकने २०१८ मध्ये ही ऑफर लाँच केली होती.

याशिवाय, पेटीएम ऑनलाइन वॉलेट कंपनी आपल्या युजर्संना पेटीएम गोल्डच्या रूपात कोणत्याही व्यवहारावर कॅशबॅक ऑफर करते. पेटीएमने ऑक्टोबर २०१६ मध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून आपले डिजिटल गोल्ड लाँच केले होते. इतकेच नाही तर पेटीएम सारख्या काही कंपन्या नाणे स्वरूपात सोन्याची डोरस्टेप डिलिव्हरी देखील देतात. अगदी चीनी इलेक्ट्रॉनिक्स कंपनी शाओमीने एप्रिलमध्ये त्याच्या पेमेंट सर्व्हिस MiPay वर डिजिटल सोन्याची ऑफर दिली आहे. 

आणखी बातम्या...

१००० वर्षांहून अधिक काळ टिकणार अयोध्येतील राम मंदिर, संपूर्ण दगडाने बांधणार    

आता पुढचे काही दिवस सामना अग्रलेखाचे विषय 'असे' असतील; नितेश राणेंची खोचक टीका    

मोदी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोना; गजेंद्रसिंह शेखावत यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह!    

जिम पुन्हा सुरू करणे आवश्यक; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी    

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जम्मू-काश्मीरमधून १० हजार जवानांना माघारी बोलविणार    

शत्रूला नकळत लष्कराचे जवान लडाखला पोहोचणार, भारताचा नवा मास्टर प्लॅन

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनPaytmपे-टीएमbusinessव्यवसायGoldसोनंtechnologyतंत्रज्ञानgoogle payगुगल पे