30,000 रुपयांपेक्षा जास्त डिस्काउंटसह iPhone XR उपलब्ध; अशी आहे Amazon ची ऑफर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 05:53 PM2021-10-14T17:53:20+5:302021-10-14T17:54:39+5:30

Amazon Sale Discount On Apple iPhone XR: Amazon च्या Great Indian Festival सेलमध्ये Apple iPhone XR वर 30,000 रुपयांपेक्षा जास्त डिस्काउंट मिळू शकतो.  

Amazon giving huge discount on apple Iphone xr at rs 32999   | 30,000 रुपयांपेक्षा जास्त डिस्काउंटसह iPhone XR उपलब्ध; अशी आहे Amazon ची ऑफर 

30,000 रुपयांपेक्षा जास्त डिस्काउंटसह iPhone XR उपलब्ध; अशी आहे Amazon ची ऑफर 

googlenewsNext

अ‍ॅप्पलने गेल्या महिन्यात आपली iPhone 13 सीरिज सादर केली आहे. ही सीरिज नवीन असल्यामुळे प्रत्येकाला परवडेल असेच नाही. परंतु कंपनीचे जुने मॉडेल्स सुरु असलेल्या फेस्टिव्हल सेलमध्ये डिस्काउंटसह विकत घेता येत आहेत. अशीच एक भन्नाट ऑफर Amazon च्या Great Indian Festival सेलमध्ये उपलब्ध आहे. या सेलमध्ये Apple iPhone XR वर 30,000 रुपयांपेक्षा जास्त डिस्काउंट मिळू शकतो.  

Apple iPhone XR वरील डिस्काउंट  

Apple iPhone XR स्मार्टफोनची मूळ किंमत 47,900 रुपये आहे. परंतु सेलमध्ये हा फोन 32,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच यावर काही बँक ऑफर्स देखील अ‍ॅमेझॉनने दिल्या आहेत. जुना फोन एक्सचेंज केल्यास 15,550 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त डिस्काउंट सहज उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे प्रभावी सूट 30,000 रुपयांपेक्षा जास्त होते.  

Apple iPhone XR चे स्पेसिफिकेशन्स  

Apple iPhone XR मध्ये 6.1-इंचाचा Liquid Retina डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये कंपनीने A12 Bionic चिपसेटचा वापर केला आहे. 2018 मध्ये लाँच झालेल्या या फोनमध्ये iOS 14 ऑपरेटिंग सिस्टम मिळते. हा एक डस्ट आणि वॉटरप्रूफ फोन आहे.  

फोटोग्राफीसाठी यात सिंगल रियर कॅमेरा मिळतो. ज्याचे रिजोल्यूशन 12-मेगापिक्सलचा सेंट आहे. जो 4K व्हिडीओ 60fps वर शूट करू शकतो. तसेच यात 7-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी कंपनीने Face ID चा पर्याय डिल आहे. हा फोन अ‍ॅपल पे, वायरलेस आणि फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.  

Web Title: Amazon giving huge discount on apple Iphone xr at rs 32999  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.