Akshay Kumar's FAU G mobile game launched; How to download, see | अक्षय कुमारचा FAU G लाँच झाला; असा करा मोबाईलमध्ये डाऊनलोड

अक्षय कुमारचा FAU G लाँच झाला; असा करा मोबाईलमध्ये डाऊनलोड

चिनी पब्जी गेमला भारतात बंदी घातल्यानंतर पब्जी प्रेमींनी व्हीपीएनचा मार्ग निवडला आहे. याद्वारे लपूनछपून पब्जी गेम खेळण्याची मजा घेतली जात आहे. अशा लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अक्षय कुमारचा FAU G (Fearless and United Guards) लाँच झाला आहे. 


खरेतर हा अक्षय कुमारचा गेम नसून तो स्टुडिओ nCore गेमिंग नावाच्या कंपनीने बनविलेला गेम आहे. हा गेम अभिनेता अक्षय कुमार प्रमोट करत असल्याने अनेकांना तो त्याचाच गेम वाटू लागला आहे. हा गेम गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध झाला असून डाऊनलोड करता येणार आहे. हा 460 एमबीचा गेम आहे. या गेमला प्ले स्टोअरवर 4.5 स्टार मिळाले असून 48k रिव्ह्यूज आले आहेत. 


FAU-G ची घोषणा झाल्यापासून या गेमची तरुणांमध्ये खूप उत्सुकता असून, याची आतुरतेने वाट पाहिली जात होती. FAU-G गेमच्या दमदार ट्रेलरमुळे याविषयीची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये गेमची घोषणा करण्यात आल्यानंतर प्री-रजिस्ट्रेशनसाठी सुरुवात झाली होती. पहिल्या २४ तासांत १० लाख जणांनी नोंदणी केली होती. बेंगळुरू येथील nCORE Games डेव्हलपर्स FAU-G गेमची निर्मिती केली आहे. अक्षय कुमारने हा गेम डाऊनलोड करण्याची लिंक शेअर केली आहे. सोबत ट्विटरवर या गेमशी संबंधित एक नवीन व्हिडीओ देखील शेअर केला आहे. हा गेम आधीच लाँच होणार होता, मात्र प्रजासत्ताक दिनासाठी तो पुढे ढकलण्यात आला होता. सध्या हा गेम केवळ अँड्रॉईड मोबाईलवरच खेळता येणार आहे. कालांतराने तो आयफोनवरही उपलब्ध होणार आहे. 


या मोबाईल गेममध्ये इन अॅप परचेसचा पर्यायही आहे. हा गेम मोफतही डाऊनलोड करता येणार आहे. मात्र, पब्जीसारखेच इन अॅप परचेसही देण्य़ात आले आहे. गेमच्या आत खरेदी करून तुम्ही लेव्हलही वाढवू शकणार आहात. 
हा गेम डाऊनलोड करण्यासाठी गुगलच्या प्लेस्टोअरवर जावे लागणार आहे. तिथे FAUGटाईप करावे लागेलय जर तुम्ही आधीच प्री रजिस्ट्रेशन केले असेल तर इथून किंवा वेबसाईवरून डाऊनलोड करू शकता. 

Web Title: Akshay Kumar's FAU G mobile game launched; How to download, see

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.