Airtel-Jioचं टेन्शन वाढणार; आता Elon Musk यांची सॅटेलाइट इंटरनेट सर्व्हिस भारतात एन्ट्री करणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 06:54 PM2023-09-17T18:54:18+5:302023-09-17T18:55:32+5:30

आता, इलॉन मस्क सर्व सरकारी मंत्रालयांची मंजूरी घेतल्यानंतर, स्टारलिंक सर्व्हिस लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत.

Airtel-Jio tension will increase; Now elon musk satellite internet service launch soon in india | Airtel-Jioचं टेन्शन वाढणार; आता Elon Musk यांची सॅटेलाइट इंटरनेट सर्व्हिस भारतात एन्ट्री करणार!

Airtel-Jioचं टेन्शन वाढणार; आता Elon Musk यांची सॅटेलाइट इंटरनेट सर्व्हिस भारतात एन्ट्री करणार!

googlenewsNext

इलॉन मस्क यांच्या, सॅटेलाइट इंटरनेट सर्व्हिस पुरवणाऱ्या स्टारलिंक कंपनीचा भारतात एन्ट्री करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यामुळे ही कंपनी आता लवकरच भारतात एंट्री करण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी परवान्याशिवाय सेवा सुरू केल्याबद्दल या कंपनीवर बंदी घालण्यात आली होती. मात्र आता, इलॉन मस्क सर्व सरकारी मंत्रालयांची मंजूरी घेतल्यानंतर, स्टारलिंक सर्व्हिस लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत.

स्टारलिंक सर्व्हिस लॉन्च झाल्यानंतर, जिओ आणि एअरटेलच्या अडचणीत वाढ होऊ शकते. कारण आता एअरटेल आणि जिओ दोघेही सॅटेलाइट इंटरनेटच्या रेसमध्ये सामील झाले आहेत. एअरटेल वन वेबसोबत सॅटेलाइट सर्व्हिस लॉन्च करत आहे. तर जिओनेही लक्झेंबर्गची कंपनी SES सोबत सॅटेलाइट सर्व्हिससाठी भागीदारी केली आहे.

किती मिळेल स्पीड - 
स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट सर्व्हिसची टॉप स्पीड 1.5 ते 2Gbps एवढी असल्याचा दावा केला जात आहे. नावाप्रमाणेच ही एक सॅटेलाइट सर्व्हिस आहे. यामुळे हिला मोबाइल टॉवरची  आवश्यकता लागणार नाही. यामुळे देशातील दूर्गम भागांमध्येही  सहजपणे इंटरनेट सेवा पोहोचण्यास मदत मिळेल. स्टारलिंक सध्या 40 हून अधिक देशांत सर्व्हिस देत आहे. इलॉन मस्क यांच्या स्टारलिंग सर्व्हिसमध्ये वाय-फाय राउटर, पॉवर सप्लाय, केबल आणि एक माउंटिंग ट्रायपॉड दिला जातो. हे राउटर सॅटेलाइटा कनेक्टेड असते.

...म्हणून स्टारलिंकवर घालण्यात आली होती बंदी -
स्टारलिंकने 2021 मध्ये लायसन्स न घेतात आपली सर्व्हिस सुरू केली होती. याच बरोबर, त्यांनी ग्राहकांकडून सर्व्हिस सुरू होण्यापूर्वीच प्री-ऑर्डर म्हणून सिक्योरिटीच्या स्वरुपात पैसेही जमा केले होते. मात्र भारत सरकारकडून मंजुरी न मिळाल्याने इलॉन मस्क यांना आपला प्रोजेक्ट बंद करावा लागला होता. तसेच भारतीय ग्राहकांचे पैसेही परत करावे लागले होते.

Web Title: Airtel-Jio tension will increase; Now elon musk satellite internet service launch soon in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.