शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
4
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
5
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
6
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
7
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
8
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
9
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
10
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
11
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
12
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
13
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
14
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
15
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
16
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
17
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

Airtel चे तीन नवीन प्लॅन लॉन्च; नेटफ्लिक्स, हॉटस्टारसह ३५० हून TV चॅनल्स पाहा मोफत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 22:04 IST

Bharti Airtel ने नवीन Xstream Fiber Broadband Plan लाँच केले आहेत. हे ब्रॉडबँड प्लॅन आधीच्या प्लॅनसारखेच आहेत.

नवी दिल्ली-

Bharti Airtel ने नवीन Xstream Fiber Broadband Plan लाँच केले आहेत. हे ब्रॉडबँड प्लॅन आधीच्या प्लॅनसारखेच आहेत. पण, या प्लॅन्समुळे यूजर्सना अधिक फायदे मिळतील. एअरटेलने तीन नवीन ब्रॉडबँड प्लॅन जाहीर केले आहेत. 

एअरटेलच्या नवीन ब्रॉडबँड प्लॅनमध्ये ६९९ रुपये, १०९९ रुपये आणि १५९९ रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. या प्लॅनमध्ये Airtel 4K Xstream Box 350 चॅनेल्सही उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. एअरटेलच्या तीनही नव्या प्लॅन्सची माहिती जाणून घेऊयात...

एअरटेलचा 1,599 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅनब्रॉडबँड प्लॅनमध्ये युझर्सना Airtel 4K Xstream Box सह ३५० हून अधिक चॅनेल्सचा अॅक्सेस दिला जाईल. मात्र, बॉक्ससाठी २ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. हे फक्त एकवेळचं शुल्क असणार आहे. या सेटअप बॉक्ससह, युझर्स केबल टीव्हीसह OTT कंटेंन्ट देखील पाहू शकणार आहेत. 

या प्लॅनमध्ये यूजर्सना 300Mbps चा इंटरनेट स्पीड दिला जातो. याशिवाय, Netflix, Amazon Prime आणि Disney + Hotstar सारख्या लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मवर देखील विनामूल्य प्रवेश दिला जातो. या योजनेसह, SonyLIV, ErosNow, Lionsgate Play, Hoichoi, ManoramaMax, Shemaroo, Ultra, HungamaPlay, EPICon, DivoTV, Klikk, Nammaflix, Dollywood आणि Shorts TV सारख्या 14 OTT प्लॅटफॉर्म सहज उपलब्ध होऊन जातील. युझर्स एका महिन्यात 3.3TB डेटा वापरू शकतात.

एअरटेलचा 1,099 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅनकंपनीने १,०९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन देखील लॉन्च केला आहे. या प्लॅनमध्ये 200Mbps स्पीड 3.3TB पर्यंत डेटा दिला जातो. त्याचे OTT फायदे १,५९९ रुपयांच्या Airtel ब्रॉडबँड प्लॅनसारखेच आहेत. पण, यासोबत तुम्हाला Netflix चे सबस्क्रिप्शन मिळणार नाही. या प्लॅनसह तुम्ही Airtel Xstream Box ऑफरचाही लाभ घेऊ शकता.

एअरटेलचा ६९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅनAirtel ने लॉन्च केलेला तिसरा प्लॅन ६९९ रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये 40Mbps चा इंटरनेट स्पीड देण्यात आला आहे. यामध्ये नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ वगळता वर नमूद केलेले सर्व OTT प्लॅटफॉर्म सहज उपलब्ध होतील. त्याचे उर्वरित फायदे वरील प्लॅन प्रमाणेच आहेत.

टॅग्स :AirtelएअरटेलInternetइंटरनेट